Mahagatha | Puranatil 100 Katha महागाथा | पुराणातील १०० कथा
‘ब्रह्मा आणि विष्णू यांनी एकमेकांबरोबर शर्यत लावली होती, ही कहाणी ऐकलीय? किंवा शिवाने कृष्णाशी युद्ध केलं होतं, ही कहाणी? किंवा इंद्राने भ्रूणहत्या करण्याचा प्रयत्न केला होता ही कहाणी? माया सीतेविषयी, नारदाच्या माकड तोंडाविषयी कधी ऐकलंय का? सूर्य आकाशातून खाली का पडला किंवा चंद्राने व्यभिचार का केला, हे माहीत आहे का?’
हिंदू धर्मामधील पुराणांमध्ये विश्वामधील ज्ञानभंडार सामावलं आहे. सातत्याने उत्तरं
शोधणाऱ्यांसाठी पुराणकथांचं महत्त्व कालातीत आहे. ह्या प्राचीन ग्रंथांमधील शंभर निवडक
पौराणिक कथांची सचित्र-संकलित आवृत्ती प्रथमच प्रकाशित होत आहे. देव, असुर, ऋषी
आणि सम्राट ह्यांच्या लोकप्रिय कथा या पुस्तकामध्ये समाविष्ट केल्या आहेतच; पण लेखक
सत्यार्थ नायक यांनी फारशा ज्ञात नसलेल्या अनेक कहाण्यांचा शोध घेऊन, त्यांचाही अंतर्भाव
यात केला आहे. उदाहरणार्थ, विष्णूचा शिरच्छेद; सरस्वती लक्ष्मीला शाप देते, तसंच हरिश्चंद्र
वरुणदेवाला फसवतो… या आणि यांसारख्या कथा फारच कमी लोकांनी ऐकल्या असतील.
सत्यार्थ नायक यांनी ह्या शंभर कहाण्यांची कालक्रमानुसार मांडणी करून त्या ‘नव्या’ स्वरूपात
सादर केल्या आहेत. सत्ययुगामधील विश्वनिर्मितीपासून सुरू झालेल्या कथांची अखेर
कलियुगाच्या आगमनाशी होते. पौराणिक संदर्भ देत त्यांनी चार युगांचा मोठा आवाका असलेल्या वेगवान कथनाची वेधक बांधणी केली आहे. एकूणएक कथा या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. ब्रह्मांडामध्ये घटनांची विलक्षण अशी एक साखळी दिसून येते. प्रत्येक घटनेला एक पार्श्वभूमी आहे. वर्तमानकाळ हा भूतकाळाला आणि भविष्यकाळाला जोडलेला असतो. कारण आणि परिणाम यांची अखंड साखळी त्यात आहे.
कर्म आणि कर्मफलाचं वर्तुळ पूर्ण होतं.
देव, दानव आणि मानव. सर्वांचीच मानसिकता समजून घेऊन त्यांच्या कृती, त्यामागील त्यांचे हेतू, विचार ह्यांचा सखोल शोध घेण्याचा प्रयत्न महागाथामध्ये केला आहे. वस्तुतः ह्या कथा, त्यांमधील पात्रं ही ‘कालातीत’ आहेत. त्या कथा वाचकांना आजही सुसंगत वाटतात, हे विशेष. त्याचप्रमाणे, रंजक शैली आणि सुरेख रेखाचित्रं यांनी नटलेली ही महागाथा मनोरंजनाबरोबरच वाचकांचं प्रबोधनही करेल. हिंदू-पौराणिक कथांचा सर्वस्वी वेगळा असा एक पैलू यामधून समोर येईल, हे निश्चित.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.