Lokmanya Tilak aani Mahatma Gandhi | लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील उत्तुंग व्यक्तिमत्वं. हे दोघेही एकाच वेळी कार्यरत होते, असा काळ म्हणजे १९१५ ते १९२०.या पाच वर्षांच्या काळात भारतात अनेक महत्त्वाच्या घडल्या. या काळात मवाळ व जहालांमधील संघर्ष निकाली निघाला, सामाजिक सुधारणांची मागणी ऐरणीवर आली, हिंदू-मुस्लिमांच्या साहचर्याच्या आणि सत्तावाटपाच्या आणाभाका झाल्या. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इंग्रजांविरुद्धच्या लढ्याच्या पद्धतीची पायाभरणी झाली. हे सर्व टिळक आणि गांधी यांच्या साक्षीने व सहभागाने घडून आलं. याच काळात देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची सूत्रं टिळकांकडून गांधीजींच्या हातात गेली. एका अर्थी ती टिळकांनी गांधीजींना सोपवलीही.हे सारं कसं घडत गेलं ? टिळक आणि गांधी यांचे स्वातंत्र्यासाठी स्वतंत्रपणे व एकत्र येऊन काय प्रयत्न चालले होते ? त्यांच्या सहमतीचे आणि मतभेदाचे मुद्दे कोणते होते ? या दोघांचं स्वतंत्र भारताबद्दलचं संकल्पचित्र काय होतं ? या व अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेणारं आणि दोन महापुरुषांच्या नेतृत्वाची सांधेजोड दर्शवणारं महत्त्वाचं पुस्तक.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.