Kshitijaparchya Sanskruti | क्षितिजापारच्या संस्कृती
लेखक मिलिंद बोकील यांचं ‘क्षितिजापारच्या संस्कृती’ हे पुस्तक क्षितिजापारच्या काही जिवंत, तर काही केवळ अवशेष मागे उरलेल्या संस्कृतींची ओळख करून देतं. या पुस्तकातील ‘कॉकेशसच्या कुशीतला आर्मेनिया’ या लेखाचा हा संपादित भाग. एका पदयात्रेच्या निमित्ताने लेखकाला झालेलं आर्मेनियातील लोकजीवनाचं वर्णन.
कॉकेशसच्या कुशीतला आर्मेनिया
अलीकडच्या काळातील एक महत्त्वाचे गांधीवादी कार्यकर्ते म्हणजे पी. व्ही. राजगोपाल. लोकजागृती करण्याची त्यांची एक आवडती पद्धत म्हणजे पदयात्रा काढणे. माझी आणि त्यांची मैत्री जवळजवळ तीस वर्षांपासूनची. त्यांच्या काही पदयात्रांमध्ये मी पूर्वी सहभागी झालेलो होतो. राजगोपाल यांनी गांधींजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त जागतिक पातळीवर अहिंसेचा संदेश देण्यासाठी २०१९ साली ‘जय जगत’ या पदयात्रेची घोषणा केली. तसे हे स्वप्न ते आधीचे अनेक वर्षे बघत होते आणि तिची तयारी २०१२ च्या पदयात्रेपासून सुरू झाली होती. दिल्लीतील महात्मा गांधींच्या राजघाट या समाधीपासून २ ऑक्टोबर २०१९ रोजी निघायचे आणि पायी मजल-दरमजल करीत २ ऑक्टोबर २०२० रोजी जिनिव्हामध्ये तिचा समारोप करायचा अशी कल्पना होती. पदयात्रेचा मूळचा मार्ग राजघाट ते वाघाबॉर्डर; तिथून पाकिस्तान, इराण, आर्मेनिया, जॉर्जिया, नंतर बाल्कन राष्ट्रे, मग इटली आणि शेवटी स्वित्झर्लंड असा होता.
(या लेखाचा उर्वरित भाग वाचा पुस्तकामध्ये)
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.