Godfather (Marathi)
हुकूमशहा, ब्लॅकमेलर, रॅकेटबाज, खुनी ज्याचा प्रभाव अमेरिकन समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचतो. भेटा त्या डॉन कॉर्लिऑनला जो आहे एक दोस्तांचा दोस्त, एक न्यायप्रिय व्यक्ती आणि एक विवेकी माणूस. अमेरिकेतील सिसिलियन माफियाचा सर्वात घातक स्वामी, द गॉडफादर.
पण कोणताही माणूस कायमस्वरूपी शीर्षस्थानी राहू शकत नाही. विशेषतः जेंव्हा त्याचे शत्रू कायद्याच्या दोन्ही बाजूंकडे असतात. आता वय झालेला व्हिटो कार्लिओन आपल्या प्रदीर्घ गुन्हेगारी आयुष्याच्या शेवटापाशी पोहोचत असताना त्याच्या पुत्रांनी परिवाराच्या धंद्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलण्यासाठी कंबर कसणे आवश्यक आहे. थोरला सोनी कार्लिओन हा तसा मुरलेला जुना खेळाडू आहे. धाकटा मायकेल कार्लिओन मात्र द्वितीय विश्वयुद्धात लढलेला माजी सैनिक असून गुन्हेगारी जगताशी अनोळखी आणि परिवाराच्या धंद्यात उतरण्यास नाखुश आहे.
Reviews
There are no reviews yet.