Ghost Writer Aani Itar Vidnyan Katha (घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा)
घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा – आशिष महाबळ
विज्ञान संशोधनाची नवनवी क्षेत्रं विकसित होत असताना विज्ञानकथा लेखनानेही नव्या कल्पना धुंडाळाव्यात, अशी अस्सल विज्ञानप्रेमी वाचकांची अपेक्षा असते. या संग्रहातल्या कथा ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतात. विज्ञानकथावाचनाची आपली इयत्ता वाढवतात.
माणूस नव्या तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक अधीन होत असताना क्षणभर थांबून त्याच्या योग्यायोग्यतेवर विचार करण्याची गरज अधोरेखित करणाऱ्या विज्ञानकथा.
आशिष महाबळ हा प्रख्यात विज्ञान संशोधक आहे. त्याचं नाव जागतिक खगोलशास्त्र परिषदेने एका लघुग्रहाला दिलं आहे. लेखकाच्या साहित्यात कुठे ना कुठे त्याच्या आयुष्याचं प्रतिबिंब पडत असतं. आशिषच्या कथाही याला अपवाद नाहीत. त्याच्या कथा विज्ञानाच्या भक्कम पायावर रचलेल्या हार्ड कोअर सायन्स फिक्शन आहेत.
– निरंजन घाटे यांच्या प्रस्तावनेतून
समकालीन प्रकाशन
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.