Futuretech Bhavishyatalya Tantradnyanancha Utkanthavardhak Vedh
₹350.00 Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00.
Author : Achyut Godbole / Asawari Niphadkar
Edition : 2024
ISBN : 9788196451776
Language : Marathi
Publisher : Krishna Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Futuretech Bhavishyatalya Tantradnyanancha Utkanthavardhak Vedh
अॅलव्हिन टोफ्लर या जगप्रसिद्ध विचारवंतानं मानवी इतिहासाचे शेती, उद्योग आणि सेवा असे तीन टप्पे मांडले आहेत. शेतीचा टप्पा हा कित्येक दशसहस्रकांचा होता. या काळात तंत्रज्ञानात फारशी प्रगती झाली नाही आणि त्यामुळे मानवी जीवनहीं फार प्रगत झालं नाही. उद्योगाचं पर्व काही शतकांचं होतं; पण त्यामध्ये माणसानं तंत्रज्ञानात खूप प्रगती केली आणि त्यामुळे त्याचं जीवन अधिक उन्नत, समृद्ध आणि गतिमान झालं.
आधुनिक सेवाक्षेत्राचा इतिहास काही दशकांचाच आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यानंतर आलेल्या इंटरनेट आणि मोबाईल्समुळे जगणं सुखद, सुकर आणि कमालीचं वेगवान झालं.
आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4.0-5.0 यांचं पर्व सुरू झालं आहे. आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याची ताकद या तंत्रज्ञानांमध्ये आहे. मेंदूशास्त्रापासून भविष्यातल्या उपचारपद्धतींपर्यंत, भविष्यातली घरं शहरं, प्रवास आणि अंतराळापर्यंत, एआयपासून नॅनो टेक्नॉलॉजीपर्यंत, कॉम्प्युटर्सपासून इंडस्ट्री 4.0-5.0 आणि अगदी सायबर वॉर घडवू पाहणारी तंत्रज्ञानं धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज होणार आहेत.
ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस, माइंडक्लोन्स, भविष्यातले औषधोपचार, एक्टोजेनेसिस, स्मार्ट सिटीज, स्पेस टुरिझम, स्पेस मायनिंग, परग्रहावरील वस्ती, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑग्मेंटेड रिअॅलिटी, व्हर्चुअल रिअॅलिटी, नॅनो टेक्नोलॉजी, बायो कॉम्प्युटर्स, फांटम कॉम्प्युटर्स, सेन्सर्स, लाय फाय, सायबर वॉर, होलोग्राम अशा भविष्याला आकार देऊ शकणाऱ्या निवडक तंत्रज्ञानांचा आढावा घेणारं पुस्तक ‘फ्युचरटेक’!
Language |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.