Fakira Annabhau Sathe फकिरा अण्णाभाऊ साठे
₹175.00 Original price was: ₹175.00.₹140.00Current price is: ₹140.00.
Author : Annabhau Sathe
Edition : 53TH-2022
Language : Marathi
Publisher : Suresh Agency
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Fakira Annabhau Sathe फकिरा अण्णाभाऊ साठे
कैफियत
‘फकिरा’ या माझ्या कादंबरीबरोबर थोडीशी कैफियतही सादर करीत आहे. आजपर्यंत मी जे लिहिलं, त्यावर झालेल्या बऱ्यावाईट टीकांचा तूर्त विचार न करता फक्त लिहीत राहायचं हे माझं धोरण आहे. उगीच मुजोरी करू नये, हेच बरं.
फक्त ‘फकिरा’विषयी थोडं सांगावं, म्हणून लिहीत आहे. ते असं की, ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेनं निर्माण केली नाही, प्रतिभेला सत्याचं जीवनाचं दर्शन नसेल, तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत, असा माझा अनुभव आहे. कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की, प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणं निरुपयोगी ठरते. मग कितीही प्रयत्न करून त्यात प्रतिबिंब दिसत नाही आणि कल्पकता निर्बल होते. अगदी पंखविरहित पाखराप्रमाणं ती उडूच शकत नाही. मी तरी अशी भरारी मारण्यात भलताच जड आहे.
जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते, तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल, तर आपण का लिहितो, याचा पत्ताच लागणं शक्य नाही.
म्हणून मी लिहिताना सदैव सहानुभूतीनं लिहिण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्यांच्याविषयी मी लिहितो, ती माझी माणसं असतात. त्यांची मुर्वत ठेवूनच मला लिहिणं भाग पडतं.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Language |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.