Ardhi Mumbai | अर्धी मुंबई
Sampadak Suhas Kulkarni
मुंबईवरील या पुस्तकाचा उद्देश वेगळा आणि गंभीर आहे.
हे वाचण्याचे पुस्तक आहे, पाहण्याचे नाही.
युनिक फीचर्सच्या तरुण पत्रकारांनी या अतिप्रचंड, अफाट वस्तीच्या आणि गुंतागुंतीच्या शहराच्या पोटात शिरून त्याचा घेतलेला हा चौकस वेध आहे.
हा वेध चौरस, परिश्रमपूर्वक आणि पद्धतशीरपणे घेतला आहे. याचा प्रत्यय पानोपानी मिळणार्या बारकाव्यांनी येतो.
इथे मुख्यतः जाणवते ती सजग समाजशास्त्रीय दृष्टी. कोणतेही शहर हितसंबंधाच्या ताण्याबाण्यांनी घडलेले असते. प्रेक्षणीय स्थळांमधून नव्हे तर दैनंदिन व्यवहारांतून ते शोधत गेले तर त्या शहराचे खरे स्वरूप उलगडते, हे महत्त्वाचे भान इथे आहे.
– विजय तेंडुलकर
प्रस्तुत पुस्तक म्हणजे मुंबईचं वर्णन किंवा चित्रण नाही. भेंडीबाजार, धारावी, गिरणगाव, आग्रीपाडा, कामाठीपुरा अशा मुंबईतल्या गरीब, कष्टकरी किंवा बदनाम आणि जगण्याशी रोज झगडा करणार्या वस्त्यांचं आणि तिथल्या लोकांचं जीवन पाहण्याचा हा प्रयत्न आहे. वर्तमानाच्या अंधारात घुसमटलेल्या आणि भविष्यातही कदाचित उजेड न सापडणार्या वस्त्या हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.