Anandwan Prayogwan by Dr. Vikas Amte | आनंदवन प्रयोगवन – डॉ. विकास आमटे
आनंदवन प्रयोगवन – डॉ. विकास आमटे
बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नाचं मूर्त रूप म्हणजे आनंदवन. पण ‘आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य’ एवढीच ओळख जनमानसात रुजलेली आहे. प्रत्यक्षात त्यापलीकडे अंध-अपंग-कर्णबधिर-बेरोजगार-शेतकरी-आदिवासी अशा समाजातील उपेक्षित घटकांना न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलं आहे.
शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरबांधणी अशा अनेक क्षेत्रांत नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम आनंदवनात उभं राहिलेलं आहे. विशेष म्हणजे, समाजाने नाकारलेल्या साध्यासुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडला आहे.
आज आनंदवन हे सुखी नांदतं गाव तर आहेच, पण त्याहीपलीकडे गावाखेड्यांच्या सर्वंकष विकासाचं जितं जागतं उदाहरणही आहे. बाबांचं स्वप्न जमिनीत रुजवणाच्या प्रयोगशील हातांची ही गोष्ट उभ्या देशाला प्रेरणा देणारी आहे.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.