Kashmir Ani Kashmiri Pandit काश्मीर आणि काश्मिरी पंडित
लेखक : अशोक कुमार पांडेय
अनुवादक : चंद्रकांत भोंजाळ
काश्मीर हे एक कोडे आहे, तर काश्मिरी पंडित कोड्याच्या आतील कोडे आहे. ज्याला आपण भारताची मुख्य धारा म्हणतो. विशेषतः हिंदीभाषक समाज, त्यांच्यासाठी काश्मिरी पंडित याचा अर्थ आहे; नव्वदच्या दशकात काश्मीर घाटीतून विस्थापित झालेले हिंदू किंवा इतिहासाच्या सामान्य ज्ञानाच्या पुस्तकातील राजतरंगिणीचे लेखक कल्हण किंवा रससिद्धांताचे प्रणेता अभिनव गुप्त. यापेक्षा जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न कमीतकमी हिंदी समाजाने कधी केलेला मी पाहिला नाही. हे पुस्तक या कोड्यातील काही गुंता इतिहासातील आणि वर्तमानातील काही स्त्रोतांच्या आधारे सोडवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
या बाबतीत काश्मीर हा कमीतकमी दक्षिण आशियाचा तो एकुलता एक प्रदेश आहे की, ज्याचा इतिहास मिथकीय कथांपासून आधुनिक काळापर्यंत लिखित रूपात उपलब्ध आहे. संस्कृत, फारसी, उर्दू आणि इंग्रजीमध्ये काश्मिरी इतिहासावर खूप सामग्री विखरून पडलेली आहे. आधुनिक काळात एक समस्याग्रस्त प्रदेश असल्यामुळे सगळ्या पक्षांनी आपल्या आपल्या पद्धतीने यावर लिहिले आहे. इतिहास आणि वर्तमानाला आपल्या आपल्या पद्धतीने तपासले आहे. जगभरातील विद्यापीठांतून यावर संशोधन झाले आहे. आणि टी.व्ही. माध्यमातून तसेच वृत्तपत्रांतून यावर खूप वेळा वादविवादही झाले आहेत. अशामध्ये या विपुल सामग्रीतून एका सम्यक दृष्टीने इतिहासाचे आणि वर्तमानाचे विवेचन करणे हे कुणाही लेखकासाठी आव्हानात्मकच होऊ शकते. हे आश्चर्यजनक आहे की, साठ सालच्या दशकात आलेल्या जियालाल किलाम यांच्या पुस्तकानंतर काश्मिरी पंडितांवर इंग्रजीमध्ये कोणतेही असे पुस्तक आले नाही जे पूर्ण काश्मीरच्या इतिहासातील त्याच्या स्थानाचे विवेचन करेल. आजच्या काळात त्याचा शोध घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की त्या वेळी नेमके काय झाले होते? ती कोणती प्रक्रिया होती ज्यात काश्मिरी समाजामध्ये एक अंतर्द्वद्व निर्माण झाले
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.