Kahun (काहून) by-Abhishek Kumbhar
काहून
लेखक : अभिषेक कुंभार
२४३ पानं । ३०० रुपये
सिहं गड पायथ्याच्या कल्याणपासून ते अटके पार
असलेल्या काहूनपर्यंतचा प्रवास म्हणजे काहून.
मराठ्यांनी अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर जाऊन
के लेला पराक्रम म्हणजे काहून. जी लढाई फक्त आणि फक्त
मराठे च करू शकतात ती लढाई म्हणजेच काहून. काहूनची
लढाई ही तिथल्या स्थानिक लुटारू टोळीवाल्यांबरोबर असली
तरी त्यापेक्षा तिथल्या वाळवंटी वातावरणाबरोबरसुद्धा
कशी आहे, हे लेखकानं अतिशय अभ्यासपूर्वक सांगितलं
आहे. काहून वाचताना बऱ्याचवेळा प्रश्न पडतो की मुघल
सैन्य सपाटीचा प्रदेश सोडून सह्याद्रीच्या डोंगरदाऱ्यांमध्ये
येत असतील तेव्हा त्यांचे काय हाल होत असतील?
उंबरखिंडीत शिवाजी महाराजांनी खानाची कोंडी करून
विजय मिळवला. मुघल सैन्याची प्रचंड प्रमाणात जीवितहानी
त्यावेळी झाली होती. मुघलांच्या सैन्याची बाजू नेमकी काय
असेल?
अगदी असाच प्रसंग आपल्यावर ओढवल्यावर आपली
मानसिकता काय असेल?
वाचता वाचता असे प्रश्न मनाच्या तळात उपस्थित करून
डोळ्यात टचकन पाणी आणणारं हे अप्रतिम पुस्तक !
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.