Gulamgiri Mahatma Jyotiba Phule गुलामगीरी
लेखक : महात्मा ज्योतिबा फुले
संपादक : गंगाधर बनबरे
‘गुलामगिरी
१८७३ साली म. फुले यांनी ‘गुलामगिरी’ हे
जहाल व ब्राह्मणी व्यवस्थेला नेस्तनाबूत करणारे पुस्तक लिहिले. ब्राह्मणी गुलामिच्या विध्वंसनाला प्रारंभ झाला. बहुजनांच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान ग्रंथ म्हणजे ‘गुलामगिरी’ होय. अत्यंत पुराव्यानिशी व चिकित्सक पद्धतीने फुल्यांनी या देशातील बहुजनांचा इतिहास मांडला आहे. वैदिक ब्राह्मणी ग्रंथातून मांडलेली त्यांची संस्कृती नाकारत असताना आपला इतिहास शोधण्याचा प्रयत्न सर्व प्रथम यात झालेला आहे. पुराणे म्हणजे भाकड कथा हे जरी खरे असले तरी त्यात बहुजनांचा इतिहास दडलेला आहे. तो मांडण्यासाठी फुल्यांची दृष्टी घेऊन कार्य करावे लागेल. अलिकडे ‘गुलामगिरी’ या मांडणीच्या पद्धतीचा अत्यंत योग्य विकास डॉ. आ. ह. साळुंखे यांनी करून ‘बळीवंश’ हा ग्रंथ सिद्ध केला आहे. महात्मा फुल्यांचा इतिहास लेखनाचा हा अत्यंत योग्य व वास्तववादी अविष्कार आहे. बहुजनांच्या इतिहासाची पुनर्मांडणीच म. फुले यांनी केली आहे. फुले हे बहुजनांचे आद्य इतिहासकार आहेत यात तिळमात्र शंका नाही..
Also Available On
Ksagar Online.Com
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.