Gadkille Ani Mi Dr. Sagram Indore | गडकिल्ले आणि मी डॉ सग्राम इंदोरे
छत्रपती शिवरायांच्या आणि गडकोटाच्या उत्कट प्रेमापोटीच महाराष्ट्रभर पसरलेल्या साधारण चारशे गडकोटांपैकी १०१ गडकिल्ल्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी देऊन, इतिहासाच्या जीर्ण कागदपत्रांमध्ये दडलेला इतिहास रात्रंदिवस एक करून शोधून काढून “गडकिल्ले आणि मी” हा ग्रंथ डॉ. संग्राम इंदोरे यांनी जन्माला घातला आहे. या ग्रंथातला साल्हेर हा नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात सीमेवर उभा आहे तर पारगड कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र गोवा सीमेवर जंगलात दडला आहे. या मधल्या सह्याद्रीच्या प्रचंड पसाऱ्यात बुद्धिबळाच्या पटावरच्या सैन्यांसम पसरलेल्या गडकोटांच्या अनगड वाटा आपल्याशा करणं, गडकोटांचा एकूण एक कोपरा धुंडाळणं, त्याची नोंद करणं आणि त्या गडकोटांवरील अवशेषांचे सुंदर फोटो घेणे हे अत्यंत जिकीरीचं कार्य. पण डॉक्टरांनी ते अतिशय उत्तम रित्या जमवलं. त्यांच्या ओघवत्या लिखाणाला त्यांच्याच सुंदर छायाचित्रांनी चार चांद लावले आहेत. जागोजागी पेरलेल्या अतिशय उत्तम स्केचेसनी आणि पेंटींगनी पुस्तकाची उंची वाढवली आहे.
गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळमधल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये तिथल्या सरकारी विभागांनी खास बनवून घेतलेली गडकोटांची किती तरी कॉफी टेबल बुक्स आपण पाहिली असतील. पण दुर्दैवानं अखंड भारताच्या स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या महाराष्ट्रातल्या गडकोटांचं एकही कॉफी टेबल बुक आजमितीला अस्तित्वात नाही. ही कमतरता “गडकिल्ले आणि मी” या ग्रंथानं नक्कीच भरून काढली आहे एवढं नक्की.
– मराठीदेशा फाउंडेशन
किंमतः ₹९९९/-
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.