क्रेविंग खाण्याचे व्यसन खाण्याच्या व्यसनाचे अपाय आणि त्यावरील उपाय डॉ. विनायक हिंगणे
Craving: Khanyache Vyasan
Khanyachya Vyasanache Apaay Aani Tyavaril Upaay © Dr. Vinayak Hingne,
वजन वाढवणारी वा कमी करणारी औषधे विकत घेण्यापूर्वी आहाराच्या संदर्भातल्या काही बाळबोध प्रश्नांचा विचार व्हायलाच पाहिजे. आपण काय खावे, केव्हा खावे, किती खावे, या मूलभूत प्रश्नांबरोबरच भूक नसतानाही आपण का खातो, आपल्याला सारखे खावेसे का वाटते, जेवणात गोड पदार्थ हवाच हा आग्रह मी का धरतो, आपले खाण्यावर अतोनात प्रेम का, आपला आवडता पदार्थ खाण्याची संधी मिळाली की सुखवस्तू घरातली माणसेसुद्धा हावरटासारखे का खातात, हे सगळे प्रश्न आहाराबद्दल जागरूक असणाऱ्या सुशिक्षित मंडळींना पडायला हवेत. अर्थात, वरकरणी प्रश्न सोपे वाटत असले, तरी त्यांची समाधानकारक उत्तरे देणे सोपे नाही. हे कठीण काम डॉ. विनायक हिंगणे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सगळ्यांना आकलन होईल, याची काळजी घेत सहज पार पाडले आहे.
लेखकाने या पुस्तकात अशा अनेक प्रश्नांची उकल करून समर्पक उत्तरे दिली आहेत. विशेष म्हणजे, आहारविषयक लिखाण करताना कळत- नकळत बरेचदा लिखाणाचा रोख प्रबोधनपर होतो. परंतु लेखकाने बहुतेक याचा विचार करूनच आपल्या लिखाणात स्वानुभवाची पेरणी उत्कृष्टपणे केली आहे. पुस्तक वाचताना आहाराच्या सवयीचा सखोल अभ्यास करून लिखाण केल्याचे जाणवते.
डॉ. राजेंद्र आगरकर एमडी (मेडिसीन)
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.