Chava Shivaji Sawant छावा शिवाजी सावंत
लेखक : शिवाजी सावंत
छावा
राजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. ‘छावा’ च्या जोरदार स्वागतानं ते सिद्ध झालं आहे.
एक दोनच नव्हे तर एकाचवेळी पाच आपाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंधर ! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिदी, गोव्याचे फिरंगी मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वाध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वास घातक्यांची !
रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुध्दभूषणम्’ काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यार्ले की मृत्यूलाही कसे घडक सामोरे जाऊ शकते. हे या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.