Babhulmaya बाभूळमाया
खरतर बांधावरच बाभूळझाड आणि बाप यांच्यात फरक तरी काय असतो? जगण दोघांचही एक, सहन करण दोघांचही एक आणि मनात जिव्हाळा लपवून वरवर कठोरपणा दाखवण दोघांचही एक. बाभळीचा डिंक कधीच मातीपर्यंत पोहचत नाही, तिथच त्या जखमेवर चिकटून राहतो. तसच बापाचा अश्रू कधीच गालावरून ओघळत नाही, कडा पानवतात आणि तिथच सुकुन जातात. तो बाप तिथल्या गाभ्यासारख आपल्या मुलांना कठोरपणा दाखवतो पण त्यांच्यासाठी हजार संकटे त्या काट्यांसारखी सोसतो. भेगाळलेल्या जमिनीत आपल्या सुखाच्या शोधात स्वत:ला हरवून राबतो. त्या बाभळीसारखाच त्याच जगण लवकर नाही ध्यानी येत. इवल्याश्या घरट्यासाठी आणि पिलांसाठी ज्यान भोगल, ज्यान सोसल, बाबा म्हणून त्याच जगण लवकर नाही कळत. तो लढतो, हरतो, अश्रू पुसतो, तरीही पुन्हा चालतो. पिकलेल्या केसात अन या दिनियेतील बाभळीसारख्या काट्यात पिलांसाठी तो बाभूळमाया जपतो.अशा बापाबद्दल मुलाची संवेदना व्यक्त करणारी कादंबरी….
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.