Asatyamev Jayate…?असत्यमेव जयते…? (मराठी)
₹699.00 Original price was: ₹699.00.₹559.00Current price is: ₹559.00.
Asatyamev Jayate असत्यमेव जयते. मराठी
Author : Abhijit Joag
Edition : 2023
ISBN : 9788195560004
Language : Marathi
Publisher : Bhishma Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Abhijit Joag
असत्यमेव जयते… ? या पुस्तकातील अतिशय समयोचित व अत्यंत महत्त्वाच्या विषयावर केलेले साधार व तर्कशुद्ध प्रतिपादन युवा पिढीसाठी फार महत्त्वाचे ठरेल. प्रत्येक देशभक्ताने हा ग्रंथ संग्रही ठेवावा, सतत चाळावा व सप्रेम भेट म्हणून अनेकांना द्यावा असे मला आवर्जून सांगावेसे वाटते. ” • स्वामी गोविन्ददेव गिरि
राष्ट्रीय संत, कोषाध्यक्ष श्रीरामजन्मभूमि तीर्थक्षेत्र (न्यास), अयोध्या –
..भारताच्या इतिहासातील दिशाभूल उलगडून दाखविणारे हे पुस्तक हा डोळसपणाने इतिहास समजून घेणाऱ्यांसाठी मोलाचा असा एक दस्तावेज आहे. रूढ इतिहासापेक्षा वेगळी, समांतर अथवा पर्यायी भूमिका घेऊन केलेली मांडणी या पद्धतीने पुस्तकांच्या रुपात सर्वकषतेने प्रथमथ वाचकांपर्यंत पोहोचत आहे. महत्वाचे म्हणजे ही मांडणी सांगोवांगी स्वरूपाची नाही. संदर्भासहित आणि पुरावे अथवा प्रमाण देऊन निर्विवादपणे मांडलेले मुद्दे असे या मांडणीचे स्वरूप आहे. ‘
– डॉ. विनय सहस्रबुद्धे
अध्यक्ष भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR), खासदार (राज्यसभा)
“… हे पुस्तक केवळ तथ्यात्मक तपशीलांनी भरलेले पुस्तक नाही तर खऱ्या भारतीय इतिहासाचे विवेचन व अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडणारा ग्रंथ आहे. क्षुल्लक वैयक्तिक फायद्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी अनेक इतिहासकारांनी भारतीय इतिहासाला मुरड घालून अत्यंत विकृत केले व एक चुकीचा, दिशाभूल करणारा आणि मोडतोड केलेला इतिहास लिहिला आणि जगासमोर मांडला ही खरंतर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. या पुस्तकाद्वारे भारताच्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या इतिहासावर बोट ठेवून वास्तविकता काय आहे याकडे लक्ष वेधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ”
डॉ. वसंत शिंदे माजी कुलगुरु – डेक्कन कॉलेज स्नातकोत्तर आणि संशोधन संस्था, जगप्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ
. आपल्या पूर्वस्मृती क्षीण वा नष्ट झालेल्या समाजाची वाटचाल पाय नसलेल्या प्राण्यासारखी फरफटलेली वा खुरटलेली असते. विविध अरबेतर मुस्लिम देश त्याचे जिवंत उदाहरण आहेत. मात्र गेल्या कित्येक शतकांपासून हिंदुस्तान ठामपणे जगाला आपली ओळख सांगतो आहे कारण हजारो विद्यार्थी व चिकित्सक अभिमान्यांनी तो हिंदुस्तान व त्याचा भूतकाळ जपण्याचे होमकुंड आपल्या प्रयासातून जपलेले आहे. धगधगत ठेवलेले आहे. ‘असत्यमेव जयते… ?’ हे पुस्तक तशाच एका यज्ञाची सत्यकथा आहे. अट्टाहास आहे, तो यज्ञ अशी आणखी होमकुंडे प्रज्वलित करील. भाऊ तोरसेकर
ज्येष्ठ पत्रकार,
Available at Ksagar Book Centre www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.