Vidyabhartee NTA/UGC SET/NET Paper-1 विद्याभारती सेट / नेट पेपर १ मार्गदर्शक
प्रस्तावना
अधिव्याख्याता पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘पात्रता परीक्षा’ अनिवार्य केलेली आहे. या परीक्षांचे स्वरूप व्यापक असल्यामुळे यामध्ये बुद्धीला आव्हान देणारे व गुंतागुंतीचे प्रथ विचारले जातात. या पात्रता परीक्षेत एकूण ३ प्रश्नपत्रिका असून त्यापैकी एक अनिवार्य असते व इतर दोन पेपर्स ऐच्छिक विषयाचे असतात. अनिवार्य पेपर क्र. १ हा सर्व विद्याशाखांच्या विद्याथ्यांना सारखाच असतो. या पेपरकरिता विद्यार्थ्यांना एकत्रित असे साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध •आहे. त्याची उणीव प्रा.बी.आर. दायमा यांनी लिहिलेल्या ‘सेट/नेट मार्गदर्शक’ या पुस्तकामुळे निश्चितच भरून निघेल.
प्रा. ब्रिजमोहन रा. दायमा हे दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर येथे सेवारत आहेत. त्यांची अभ्यासूवृत्ती, जिद्द, गुणवत्ता, चिकाटी, परिश्रमशीलता इत्यादी गुणांचे फलीत म्हणजेच ही ग्रंथनिर्मिती होय. त्यांनी अध्यापन काळात विद्याथ्र्यांत एक अभ्यासू प्रिय प्राध्यापक म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. त्यांच्या विद्यार्थी जीवनातील गुणवत्तेचा आलेख सतत चढत्या क्रमानेच विकसित झाल्याचे दिसून येते. त्यातूनच त्यांनी वाणिज्य शाखेत बारावी बोर्डात सहावा तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड मध्ये बी.कॉमच्या परीक्षेत सर्वप्रथम येण्याचा बहुमान संपादन केला आहे. एम. कॉम नंतर त्यांनी अनेकांना असाध्य वाटणाऱ्या नेट व सेट या दोन्हीही परीक्षा प्रथम प्रयत्नातच यशस्वी होण्याचे यश खेचून आणले आहे.
खरं तर हाडाचा शिक्षक एकीकडे शिकवत तर दुसरीकडे शिकत असला पाहिजे. प्रा. बी.आर. दायमा है अध्यापनाच्या क्षेत्रात आल्यानंतरही त्यांनी आपले सखोल लेखन, वाचन चालू ठेवले. त्याचीच परिणती म्हणजे ही ग्रंथनिर्मिती होय. सेट / नेट च्या परीक्षेला बसल्यानंतर विद्यार्थ्यांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्याची पुरेपूर जाण प्रा. दायमा यांना असल्यामुळेच त्यांनी ‘सेट/नेट मार्गदर्शक’ या दर्जेदार ग्रंथाचे लेखन केले. प्रा. दायमा आज सेट/नेट परीक्षेला बसणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे आधारस्थान झाले आहेत.
सेट/नेटला बसणाऱ्या व प्राध्यापक होऊ इच्छिणान्या उमेदवारांची दर्जेदार ग्रंथाअभावी कुचंबणा होत असे. मनाची तयारी असूनही सेट/नेट च्या अभ्यासक्रमाची सरळ व सोप्या भाषेत मांडणी करणारे उपयुक्त पुस्तक नसल्याने विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असे. प्रा. दायमा यांनी अथक परिश्रम घेऊन हे ‘सेट/नेट ज्ञानभांडार’ उपलब्ध करून दिले आहे. प्रा. दायमा स्वतः या प्रक्रियेतून गेलेले असल्यामुळे त्यांनी या ग्रंथाची मांडणी समर्पक, साध्या आणि सरळ भाषेत केली आहे.
या ग्रंथात सेट / नेट परीक्षेसंबंधीची सर्व प्रकारची इत्यंभूत माहिती प्रा. दायमा यांनी दिली असून त्यात सेट / नेट परीक्षेसंबंधी सर्वसाधारण माहिती, पेपरचे स्वरूप, पात्रता, अटी, नियम, परीक्षाकेंद्रे. विषय इत्यादीबाबत सविस्तर तपशील मांडलेला आहे. सेट/नेटच्या परीक्षार्थीना जे नेमके हवं ते देण्याचा अचूक प्रयत्न प्रा. दायमा यांनी या ग्रंथनिर्मितीद्वारे साध्य केला आहे.
-होईल आणि पुढील आवृत्तीत त्यात सुधारणा करण्यास मदतच होईल.
सर्व विद्यार्थिमित्रांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा !
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.