SET NET Vastunishtha Itihas Paper-2 सेट/नेट इतिहास पेपर-२
दोन शब्द
‘सेट-नेट इतिहास’ हे पुस्तक सेट-नेट इतिहास परीक्षा पेपर क्र. ०२ साठी परीक्षार्थीला अभ्यासासाठी सहाय्यक आणि मार्गदर्शक ह्या उद्देशाने केलेला प्रयत्न आहे. सेट-नेट इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती लक्षात घेवून अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाला स्पर्श लिखाण करताना केलेला आहे. पेपर क्र. ०२ | मध्ये विचारल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ प्रश्नाची मांडणी संपूर्ण अभ्यासक्रमात समाविष्ट होईल अशी केलेली आहे. सेट-नेट इतिहास पेपर क्र. ०२ मध्ये विचारलेल्या प्रश्नांची खोली (Deepness) जास्त असल्याचे जाणवते. अशा वेळी परीक्षार्थीला अथवा अभ्यासकाला पेपर ०२ मधील प्रश्न हे अतिशय क्लीष्ट, संभ्रम निर्माण करणारे आणि कठीण वाटतात. म्हणून ह्या पुस्तकात वस्तुनिष्ठ प्रश्नाचे पर्याय न देता एका वाक्यात माहिती अथवा उत्तर नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे. सेट-नेट इतिहासाचा अभ्यास करताना परीक्षार्थी जास्तीत जास्त लक्ष भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ एप्टीकडे देतो. संशोधन पद्धतीच्या अभ्यासक्रमावर विश्लेषणात्मक असे ०८ प्रकरणे ह्या पुस्तकात भाग ०४ मध्ये दिले आहेत.
परीक्षार्थी असताना व अध्ययन आणि अध्यापन करताना जे अनुभव आणि योग्य मार्गदर्शन मला मिळाले त्यातून सहकारी प्राध्यापकांनी आणि मित्रांनी सेट-नेट इतिहास संदर्भात इतिहासलेखन करण्याबाबत सतत धरलेला आग्रह ह्यामुळे हे कार्य होवू शकले.
माझे गुरू आणि मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉ. रोडे सरांचे प्रेरणा आणि प्रोत्साहन मला विद्यार्थी | दशेपासूनच लाभले आहे. त्यामुळेच हे कार्य मी हाती घेवू शकलो. लिखाणासाठी सक्रीय साह्य स्नेही प्रा. दत्ता जाधव, प्रा. विजय कुलकर्णी, प्रा. सदाशिव दंदे व प्रा. किशोर भोईबार, ग्रंथालय महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर येथील सर्वांचे तसेच आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. सुरेश संदीकर सर आणि माझे सहकारी प्रा. कालिदास सूर्यवंशी व सर्व कॉलेज मधील सहकारी यांचा मी आभारी आहे.
माझ्या लिखाणाची पूर्तता व्हावी म्हणून सतत मदत आणि मौलिक साह्य करणारे आदरणीय वडील, सौ. आई, सौ. वहिनी व भाऊ यांचे सतत आशीर्वाद लाभल्याने ही निर्मिती होवू शकली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. ‘विद्याभारती प्रकाशन’ व ‘भारतीय पुस्तकालयाचे श्री. उदय जोशी व रवि जोशी व सिस्टीम ऑपरेटर श्री. राम जोशी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे लिखाण पुस्तकरूपात पूर्ण करू शकलो, त्याबद्दल त्यांचे आभार. पुस्तकातील माहिती जास्तीत जास्त अचूक, अद्यावत आणि सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी नजरचुकीने कांही त्रुटी राहून गेल्या असल्यास अभ्यासकांनी त्या कळवाव्यात ही विनंती.
सर्व वाचकांस व सेट-नेट परीक्षार्थीस परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा..
धन्यवाद !!
प्रा. प्रशांत सु. देशमुख
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.