SET/NET VANIJYA PAPER 2 सेट/नेट वाणिज्य पेपर २
प्रस्तावना
विद्यार्थिमित्रहो,
सेट/ जेट वाणिज्य पेपर-2 हा संदर्भ आपल्या हाती देताना आम्हाला विनय आनंद होत आहे. या संदर्भ
धाची रचना सेट/नेटच्या नवीन अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीनुसार करण्यात आलेली आहे. वाणिज्य पेपर-2 या पुस्तकात एकूण दहा विभाण करून त्यामध्ये वाणिज्यच्या वेणवेणया शाखांचा समावेश करण्यात आलेला आहे. जसे की, व्यावसायिक पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय Accounting and Auditing. व्यावसायिक अर्थशास्त्र, व्यापार वित्त, व्यावसायिक संख्याशास्त्र आणि संशोधन पद्धती, व्यवसाय व्यवस्थापन आणि मानवी संसाधन व्यवस्थापन, बँकव्यवसाय आणि वित्तीय संस्था, विपणन व्यवस्थापन. व्यवसायाच्या कायदेशीर बाजू आयकर आणि कर नियोजन इत्यादी
आम्ही आमचा सर्व अनुभव आणि संग्रहित साहित्याचा या पुस्तकासाठी उपयोग केला आहे. आम्हाला याची पूर्ण खात्री आहे की, हा संदर्भ व सर्व परीक्षार्थीसाठी मोलाचे मार्गदर्शक ठरेल. हा संदर्भ ग्रंथ तयार करताना अध्यायत माहितीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक विभागाची विस्तृत माहिती विभागाच्या शेवटी भरपूर सराव प्रश्न तसेच आयोगाच्या मानी परीक्षेत
विचारलेल्या प्रश्नांचा समावेशही केलेला आहे.
हा संदर्भ ग्रंथ लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल निराली प्रकाशनचे श्री. विनेशभाई फुरिया व
श्री. फुरिया यांच्या ऋणात राहणेच आम्ही पसंत करतो..
सौ. जयश्री परदेशी व सौ. योजना गणेश देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन अंध लिहिताना उपयोगी ठरले. सौ. सुजाता उमेश जाधव व सौ. पद्मा सुभाष धोरात यांनी संदर्भ अंधाची अक्षरजुळणी अतिशय उत्कृष्ट रीतीने केली. त्यामुळे या संदर्भ बंधारा सुबकता व नीटनेटकेपणा आला, त्यास जोड म्हणून सौ. गायत्री लोणी, सौ. शारदा भांदरणे आणि सौ. स्नेहल गुळवणी यांनी मुद्रितशोधनाची जबाबदारी यथोचित रीतीने पार पाडली.
श्री. रवींद्र वाकोवरे यांनी आकर्षक मुखपृष्ठ तयार केले. श्री. दामोदरप्रसाद गौड यांनी या संचाची आकर्षक
छपाई केली. या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
MPSC आणि UPSC चे विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठीही हा संदर्भ अतिशय उपयुक्त आहे. संदर्भ ग्रंथात अनावधानाने काही त्रुटी राहिल्या असतील तर आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात. त्यांचे स्वागतच होईल आणि पुढील आवृत्तीत त्यात सुधारणा करण्यास मदतच होईल..
सर्व विद्यार्थिमित्रांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा !
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.