SET NET SHARIRIK SHIKSHAN PAPER 2 सेटनेट शारीरिक शिक्षण
मनोगत
शिक्षण प्रक्रियेत ‘शारीरिक शिक्षण’ या विषयास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शारीरिक शिक्षण हे शिक्षणाचे अविभाज्य अंग आहे असेही महटले जाते. म्हणूनच व्यक्तीचा सर्वांगीण विकास हेच शारीरिक शिक्षणाचे मुख्य ध्येय आहे. हे ध्येय साध्य होण्यासाठी शारीरिक शिक्षण अंमलबजावणीची प्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या व उत्कृष्टतेने राबविली जाणे महत्त्वाचे असते, यासाठी गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शारीरिक शिक्षण शिक्षकांची खूपच आवश्यकता असते. असे शिक्षक निर्माण करण्यासाठी त्याच क्षमतेचे प्राध्यापकही असावेत म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय पातळीवर पात्रता चाचणी परीक्षेची सुरुवात केलेली आहे. आता राज्य पातळीवरसुद्धा ही परीक्षा घेतली जाते.
या पात्रता चाचणी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विविध संदर्भ साहित्यांची खूपच गरज असते. शारीरिक शिक्षणातील पदव्युत्तर पदवी (एम.पी.एड./एम.एड. शारीरिक शिक्षण) प्राप्त केलेले अनेक विद्यार्थी केवळ मराठीत या राज्य पातळीवरील पात्रता चाचणी परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित संदर्भ साहित्य उपलब्ध नसल्यामुळे अयशस्वी होतात
विद्यार्थ्यांची ही मुख्य अडचण स्वतः या राज्य पातळीवरील पात्रता चाचणी परीक्षेत यशस्वी झालेल्या अनुभवी लेखकांना जाणवली आणि ही अडचण दूर करण्याच्या प्रामाणिक भावनेतूनच राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक तयार झाले.
हे पुस्तक सेट / नेट परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
या पुस्तकाच्या लिखाणासाठी अनेक लेखकांच्या विविध पुस्तकांचा, संदर्भ ग्रंथांचा ‘संदर्भ’ म्हणून उपयोग करून घेतला आहे.
सर्वप्रथम आम्ही या सर्व लेखकांचे मनःपूर्वक ऋण व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो.
लिखाणास सदैव प्रवृत्त करणाऱ्या सर्वांचे सविनय आभार आमच्या कुटुंबीयांच्या भक्कम आधारामुळेच आम्ही काम यशस्वीरीत्या पूर्ण करू शकलो.
‘शारीरिक शिक्षण’ या पुस्तकाचे लेखन करण्यास निराली प्रकाशन या प्रकाशन संस्थेचे श्री. दिनेशभाई फुरिया प श्री. निम्मेशभाई फुरिया यांनी प्रोत्साहन दिले आणि या पुस्तकाचे प्रकाशन केले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार ।
श्री. नितीन भुतडा यांनी या पुस्तकाचे डीटीपी (अक्षरजुळणी) उत्कृष्टरीत्या केले. कविता पवार यांनी मुद्रितशोधन केले.
यांचा मी ऋणी आहे. विद्यार्थी व शिक्षक या पुस्तकाचे स्वागत करतील याची आम्हाला खात्री आहे. त्यांच्या सूचनांचे व प्रतिक्रियांचे स्वागतच होईल !
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.