Rajkiya Siddhant Ani Bhartiya Rajkaran :राजकिय सिद्धांत आणि भारतीय राजकरण
स. मा. गर्गे , प्रा. चिं.ग. घांगरेकर , प्रा. व्ही. बी. पाटील,व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
सन २०२३ मध्ये होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नुकताच बदलला असून परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांऐवजी पारंपरिक झाले आहे. सामान्य अध्ययनाचे चार पेपर्स मराठी, इंग्रजी व निबंध यांसह आपणास आता एका वैकल्पिक विषयाच्या दोन पेपर्सचीही तयारी करावी लागणार आहे.
प्रस्तुतचे पुस्तक हे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या पेपर-१ (सांकेतांक १०४९ मधील विभाग-१ राजकीय सिद्धान्त आणि भारतीय राजकारण अभ्यासक्रमानुसार रचना केले आहे.
आदरणीय स. मा. गर्गे. भारतीय समाजविज्ञान कोषाचे कर्ते. मला गुरुस्थानी असलेले एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. सरांनी लिहिलेले राज्यशास्त्र विकास व सुगम राज्यशास्त्र हे ग्रंथ राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासासाठी मला सातत्याने दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरलेले. या दोन ग्रंथांच्या माध्यमातून सरांनी अनेक पाश्चात्त्य व भारतीय राजकीय विचारवंतांच्या विचारांचा परामर्श घेतलेला.
प्रा. चिं.ग. घांगरेकर. माझे ज्येष्ठ स्नेही व अनेक पुस्तकांचे माझे सहलेखक. त्यांच्याच सहकार्यातून ‘राज्यशास्त्र सिद्धान्त आणि राजकीय विचार’ हा विद्यार्थिप्रिय ग्रंथ साकारलेला. याही ग्रंथाच्या माध्यमातून आम्ही उभयतांनी अनेक पाश्चात्त्य व भारतीय राजकीय विचारवंतांच्या राजकीय विचारांचा परामर्श घेतलेला.
प्रा. व्ही. बी. पाटील. राज्यशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक आणि अध्यापक. व्यक्तीश: माझे ज्येष्ठ स्नेही व के’सागर परिवाराचे एक सुहृद. प्रकाशनाची अनेक पुस्तके त्यांच्या अभ्यासू लेखणीतून स्वतंत्रपणे तद्वतच अस्मादिकांबरोबर संयुक्तपणे साकारलेली.
या सर्व सुहृदांनी प्रकाशनाकरिता लिहिलेल्या पुस्तकांतील व अस्मादिकांनीही यापूर्वी लिहिलेल्या पुस्तकांतील ऐवजावर या पुस्तकाची रचना साकारली असून अभ्यासक्रमास न्याय देण्यासाठी काही मजकूर अस्मादिकांनी नव्याने लिहिला आहे.
पदवी वा पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यास करीत असतानाच केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षांतील वैकल्पिक विषयांची परिपूर्ण तयारी व्हावी आणि ही शिदोरी बरोबर घेऊनच विद्यार्थिमित्रांना केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयांची अधिक परिपूर्ण तयारी करता यावी; तद्वतच संबंधित विषयांचे प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्यांना सेट-नेट परीक्षांची तयारी करण्यास उपयुक्त ठरावे, अशा समन्वयित दृष्टिकोनातून सर्वसमावेशक व व्यापक संदर्भ ग्रंथांची एक मालिका साकारण्याचा सर्वथैव शैक्षणिक प्रकल्प प्रकाशनाने हाती घेतला आहे. प्रस्तुतचा हा ग्रंथ म्हणजे वरील तीन मार्गदर्शक सुहृदांच्या साथीने त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होय.
वरील तीन आदरणीयांचे या ग्रंथाच्या लेखनातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता राज्यसेवा मुख्य परीक्षेतील राज्यशास्त्र विषयाच्या पहिल्या पेपरमधील पहिल्या विभागाच्या अभ्यासासाठी विद्यार्थी मित्रांना तो निश्चितच उपयुक्त सिद्ध व्हावा. आपलाच,
हार्दिक शुभेच्छांसह!
व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.