Sampurn Marathi -Akash Ligade संपूर्ण मराठी
लेखक : आकाश लिगाडे
प्रस्तावना
माणदेशासारख्या दुष्काळी भागातून अनेक अधिकारी घडतात हे पाहताना अत्युच्च आनंद होतो. या माणदेशातून आणखी रत्ने घडावीत म्हणून वेळोवेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे बाळकडू देण्यासाठी अनेक तज्ञ प्राध्यापक व स्पर्धा परीक्षेतील यशवंत यांच्या मार्गदर्शनाचे अनेक उपक्रम राबविले गेले. अशाच एका माणदेशी अधिकाऱ्याने लिहीलेले व स्पर्धा परीक्षार्थीना उपयुक्त ठरेल असे पुस्तक प्रकाशित करताना मला अत्यंत आनंद होत आहे..
‘जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना शिकवावे’ या उक्तीप्रमाणे यशाचा खडतर प्रवास करताना आलेल्या अडचणींवर मात करण्याचे तंत्रच या पुस्तकात दिलेले आहे. एमपीएससीचा अभ्यास करताना दुर्लक्षित होणाऱ्या मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये कमी वेळेत जास्त गुण मिळविणे क्रमप्राप्त आहे. हे ओळखूनच एकाच ठिकाणी सर्व बाबींची उपलब्धता, कोणत्या प्रकरणावर अधिक भर द्यावा याचे विश्लेषण, उत्कृष्ट निबंधांची गुंफण व प्रश्नपत्रिकांचे प्रकरणनिहाय केलेले विश्लेषण या बाबी या पुस्तकात दिलेल्या आहेत. त्यामुळे लेखन विभाग असो किंवा व्याकरण विभाग सर्वच घटकांच्या दृष्टीने हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.
लेखन कौशल्य, व्याकरण व शुद्धलेखन याचे तंत्र आत्मसात करणे ही सर्वांसाठीच गरजेची बाब आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेसोबतच शालांत व महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी विषयाचे अभ्यासक अशा सर्वांनाच हे पुस्तक उपयोगी ठरणार आहे, अशी माझी खात्री आहे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरावेत, असे प्रयत्न करावेत हीच अपेक्षा आहे.
श्री. प्रभाकर देशमुख, भा. प्र.स. आयुक्त, कोंकण
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.