Samagra Marathi Vyakaran समग्र मराठी व्याकरण
विश्वात ज्ञानाइतके पवित्र दुसरे काहीही नाही. ज्ञानाची पवित्रता एकदा का अंतःकरणाला मिली की कितीही काळ लोटला, स्थळे बदलली, बाद झडले तरी से ज्ञान होत नाही, उलट नवीन ज्ञानाची भर प जे शाश्वत आहे, ते तेजाळून निघते.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरसारख्या लहानशा गावात दहावीपर्यंत शिकताना मला जे ज्ञान गुरुजन आणि आईकडून मिळाले, त्याचा उपयोग आजतागायत होतो आहे. लग्न होऊन नागपूरला आल्यावर नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात बी.एड्. ते एम. फिल., पीएच.डी. पर्यंतच्या शिक्षणात जुन्या ज्ञानाची उजळणी होऊन पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारज्ञानातही भर पडली. लग्नापूर्वी आईच्या आशीर्वादाने आणि लग्नानंतर पतीच्या मार्गदर्शनाने जे- जे शिकायला, वाचायला, समाजात वावरताना मला मिळाले, त्यात उत्तम, उदात्त, उन्नत ते-ते मी माधुकरीवृत्तीने मनात संचय करीत गेले.
ग्रॅज्युएशन करीत असताना रेल्वे मेन्स नागपूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून शिकविले. बी. एड.ला असताना पटवर्धन हायस्कूलमध्ये लेसन, एम.फिल., पीएच.डी. झाल्यावर नंदनवनच्या महिला महाविद्यालयात कनिष्ठ, वरिष्ठ, पदव्युत्तर, एम. फिल. मधील विद्यार्थ्यांना शिकविले. पुढे नवप्रतिभा महाविद्यालय नागपूर येथे प्राचार्यपद भूषविताना अध्ययन, अध्यापन करता-करता मी जे टिपले, त्याचा उपयोग झालेला आहे. होतो आहे आणि होत राहील.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.