Marathi Vyakaran Prashnasanch मराठी व्याकरण प्रश्नसंच – श्रीकांत तायडे.
लेखक : श्रीकांत तायडे.
लेखकाचे मनोगत
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
स्पर्धा मराठी व्याकरण या विषयाला अतिशय महत्त्व आहे. सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणावर प्रश्न असतात आणि हे प्रश्न परीक्षेतील यश-अपयश ठरवतात. दीपस्तंभ मराठी व्याकरण प्रश्नसंच 5100+ या पुस्तकात आम्ही MPSC च्या परीक्षांमध्ये आलेल्या प्रश्नांचे घटकांनुसार वर्गीकरण केले आहे आणि काही सराव प्रश्नांचा समावेश केला आहे. विद्याथ्र्यांनी अभ्यास करत असताना व्याकरण विषयक पुस्तकातून एखादा घटक वाचल्यानंतर त्यावर MPSC ने विचारलेले प्रश्न या पुस्तकातून अभ्यासावेत. त्यामुळे अभ्यासाला योग्य ती दिशा मिळेल. या पुस्तकाचा सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल, अशी मला खात्री आहे.
कोणत्याही कामामागे एकाचे नाव लागत असले तरी त्या कामास पूर्णत्व येण्यासाठी बऱ्याच लोकांचे परिश्रम व प्रयत्न कारणीभूत असतात. माझ्या आई-वडिलांनी व बहिणीने या पुस्तकाची निर्मिती करण्याकरीता सतत प्रोत्साहन दिले व अमूल्य सुधारणाही सुचविल्या.. ज्यामुळे प्रश्नांचे स्वरूप अधिक सुलभ व आकलनास सोपे होण्यास मदत झाली.
तसेच दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक यजुर्वेद्र महाजन सर, डॉ. किरण देसले सर, जयदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून प्रकाशकांच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक कमी वेळेत पूर्णत्वास जाऊ शकले. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे या पुस्तकाची रचना, मांडणी, मुद्रण याची जबाबदारी असणारे अमोल महाजन सर, किरण कुलकर्णी व प्रकाशक जगदीश महाजन सर, सुनील पाटील सर यांच्या सहकार्याबद्दल मनापासून आभार. सर्वांना आगामी परिक्षांकरीता हार्दिक मन पुर्वक शुभेच्छा !
श्रीकांत श्रीकिसन तायडे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.