Deepstambh Spardha Pariksha Marathi Vyakaran
मनोगत व आभार
स्पर्धा परीक्षांच्या आव्हानात्मक क्षेत्रात प्रवास करणाऱ्या सर्व बंधू-भगिनींनो,
गेल्या वर्षभरात ” स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण’ या पुस्तकाच्या आजपर्यंत हजारो प्रती संपल्या याबद्दल आपल्या सर्वाधि आभार मानतो. तुम्ही माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाचे हे प्रतीक आहे. ‘गुणवत्ता’ आणि ‘परिपूर्णता’ हे दीपस्तंभचे सूत्र आहे. या दोन्ही गुणांचा संगम तुम्हाला पुस्तकात आढळेल. परीक्षेतील बदलते स्वरूप व पद्धती लक्षात घेऊन पुस्तकात सराव चाचण्यांची आखणी केलेली आहे. ‘जिद्द, मेहनत व सातत्य’ ही स्पर्धा परीक्षेतील यशाची त्रिसूत्री आहे. याचा अंगीकार जर प्रत्येकाने केला तर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकते. माझ्याही वाटयाला भरपूर अपयश आले. मात्र, दीपस्तंमचे बहुमोल सहकार्य व सकारात्मक वातावरण यामुळे अपयशावर मात करत आज स्वतःच्या पायावर उभा राहिलो.
पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त करणारे व जीवनाची दिशा दाखणारे आदरणीय प्रा. यजुर्वेद्र महाजन सर व ज्यांनी मला मराठी
शिकवले ते प्रा. मिलिंद मोहिते सर (Dy. SP) आणि शाबासकीची थाप देणारे प्रा. अग्रवाल सर (द अॅकॅडमी, पुणे) व माझ्या
पंखात नेहमी बळ भरणारे व कठीण परिस्थितीशी कसा संघर्ष करावा, हे शिकवणारे माझे वडील व जिने फक्त जन्मच दिला असे
नाही तर खूपच चांगले संस्कारही केले अशी माझी आई यांच्या ऋणात आजन्म राहू इच्छितो.
पुस्तक लिहित असताना मदत करणारे माझे मित्र प्रा. रवींद्र महाजन सर, दीपक पाटील, वैशाली पाटील (शिक्षिका). श्री.गणेश पाटील (SP Excise.), श्री. संदीप डोमाळ, डॉ. विशाल राठोड (Dy. CEO), श्री. कपिल पवार (वित्त व लेखाधिकारी वर्ग -१), श्री. जयदीप पाटील, श्री. रामचंद्र पाटील, श्री. अजय बिडवे, श्री. श्रीकांत नेवे (PSI) व श्री. तुषार वडगावकर सर यांचे आभार व माझ्या पाठीशी उभे राहणारे श्री. जगदीश महाजन, श्री. पी. डी. गावंडे, दीपस्तंभ परिवार व प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या या कामात मदत करणाऱ्या सर्व मित्रमंडळींचे आभार.
तसेच पुस्तकाची अक्षर जुळणी करणारे श्री. अमोल महाजन (इमेज क्रिएशन) यांच्याशिवाय हे पुस्तक पूर्णच होऊ शकले नसते.
मित्रहो, आपल्यासाठी लिहिलेले हे पुस्तक अचूक व परिपूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे. मात्र, यात आवश्यक • असणारे घटक किंवा काही योग्य बदल असल्यास मी नम्रपणे आपल्या सूचनांचा स्वीकार करीन..
धन्यवाद! आपला ऋणी लीलाधर पाटील
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.