Buddhimatta Chachani Samagra Margdarshak
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील ‘सामान्य क्षमता चाचणी’ या दोनशे गुणांच्या प्रश्न- पत्रिकेतील पन्नास गुणांचे प्रश्न बुद्धिमापन चाचणीवर आधारलेले असतात; तर पोलीस उपनिरीक्षक व तत्सम पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षेतील ‘सामान्यज्ञान व बुद्धिमापन चाचणी’ या दोनशे गुणांच्या प्रश्नपत्रिकेतील सत्तर गुण बुद्धिमापन चाचणी या घटकास असतात. आयोगाच्या इतर परीक्षां- मध्येही बुद्धिमापन चाचणीच्या प्रश्नांवर भर दिला जातो. या विषयाची तयारी जर परिपूर्ण झाली असेल तर या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविण्याची संधी असते. यावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षां- मध्ये बुद्धिमापन चाचणी या विषयास असलेल्या गुणांचे मोल ध्यानी यावे.
उपरोक्त परीक्षेशिवाय इतरही अनेक (कॉन्स्टेबल, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कृषिसेवक, लिपिक आदी) सरळसेवा परीक्षांमध्ये आणि TCS-IBPS या कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या अन्य अनेक स्पर्धा परीक्षांसाठीही बुद्धिमापन चाचणी हा एक अनिवार्य घटक असतो आणि वर सांगितल्याप्रमाणे त्या घटकास असलेल्या सर्वच्या सर्व गुणांवर आपण आपला हक्क प्रस्थापित करू शकतो. ही बाब लक्षात घेऊन राज्यसेवा पूर्व परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक व तत्सम पदांसाठी घेतली जाणारी मुख्य परीक्षा तद्वतच अन्य स्पर्धा परीक्षांनाही उपयुक्त ठरावे, हा उद्देश समोर ठेवून आणि संबंधित परीक्षांचा अभ्यासक्रम व पूर्वीच्या प्रश्नपत्रिका यांचा यथायोग्य विचार करूनच प्रस्तुतच्या पुस्तकाची रचना साकारली आहे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.