लेखक : प्रदीप कारभारी सानप / फिरोज दिलावर पठाण
अभिनव प्रकाशनाच्या ‘समग्र अंकगणित’ या पुस्तकाच्या दुसन्या आवृत्तीस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल आम्ही विद्यार्थी मित्रांचे अत्यंत आभारी आहोत ! स्पर्धा परीक्षांमध्ये ‘बुद्धिमत्ता चाचणी’ आणि ‘अंकगणित’ हे दोन विषय असे आहेत जे पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्याची क्षमता बाळगतात. ‘बुद्धिमत्ता चाचणी’ व ‘अंकगणित’ या विषयांच्या दोन्ही पुस्तकांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने आम्हास मनस्वी आनंद होत आहे.. फिरोज पठाण हे माझे विद्यार्थी मित्र आणि अध्यापन क्षेत्रातील सहकारी! गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांतील त्यांची आवड, परिपकता आणि ते विषय वेगवेगळ्या पद्धतीने सोपा करून सांगण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. या दोन्ही विषयांचे अध्यापन करीत असताना त्यांनी या विषयांत अनेक क्लृप्त्या आणि तंत्रे (Tactics & Techniques) विकसित केल्या आहेत. या पुस्तकांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचत असल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. मागील आवृत्तीप्रमाणेच विद्यार्थी मित्र या आवृतीचे देखील तितक्याच आत्मीयतेने आणि प्रेमाने स्वागत करतील अशी अपेक्षा बाळगतो..
सर्व विद्यार्थी मित्रांना आगामी सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा!
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.