लेखक : डॉ. प्रदीप नागोराव आगलावे
प्रस्तावना
‘समाजशास्त्रीय : संकल्पना आणि सिद्धांत’ या पुस्तकाची ही सहावी सुधारित आवृत्ती आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे हे द्योतक आहे असे मी समजतो.
समाजशास्त्रात एम्. ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘समाजशास्त्र’ (General Sociology) हा एक पेपर असतो. त्यामध्ये समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथास ‘समाजशास्त्रीय : संकल्पना आणि सिद्धान्त’ हे नांव दिले आहे. महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठातील ‘एम्.ए. समाजशास्त्र’ या पेपर करिता प्रस्तुत पुस्तक उपयुक्त आहे.
‘समाजशास्त्राचा उदय आणि विकास’ या नवीन प्रकरणात युरोपातील सरंजामशाही, फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती आणि भांडवलशाही यांचा समाजशास्त्रावर झालेला परिणाम सविस्तर घेतला आहे. अभिजात समाजशास्त्रीय विचारांवर या क्रांतीचा चांगलाच प्रभाव पडत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रकरणात आवश्यकतेनुसार नवीन माहिती दिली आहे.
या नवीन आवृत्तीत ‘समाजशास्त्रातील प्रमुख दृष्टीकोन’ आणि ‘लिंगाची संकल्पना’ ही दोन प्रकरणे नव्याने समाविष्ट केली आहेत. ही माहिती विद्यार्थी व प्राध्यापकांना खूप उपयुक्त ठरेल.
माझ्या सर्वच पुस्तकांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो तो या पुस्तकालाही लाभेल अशी अपेक्षा आहे.
२६ ऑगस्ट २०२१ – डॉ. प्रदीप आगलावे Dr. Pradeep Aaglave
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.