लेखक : डॉ. प्रदीप नागोराव आगलावे
प्रस्तावना
‘पाश्चात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञ’ या ग्रंथाची पहिली आवृत्ती १९९५ मध्ये प्रकाशित झाली होती. या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपल्यानंतर सुधारित आवृत्ती काढावी, असा विचार काही वर्षापासून मनात घोळत होता. श्री साईनाथ प्रकाशनच्या संचालिका ललिता पुराणिक या सतत मला आग्रह करीत होत्या. परंतु माझ्या व्यस्ततेमुळे मला शक्य झाले नाही. प्राध्यापक आणि विद्यार्थी मंडळींनी सतत पत्र लिहून प्रस्तुत ग्रंथाची नवीन आवृत्ती काढण्याचा आग्रह केला.
२००७ मध्ये या ग्रंथाची नवीन सुधारित आवृत्ती काढली. त्याला विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे २०१० मध्ये लगेचच तिसरी आवृत्ती काढावी लागत आहे.
• प्रस्तुत ग्रंथाचे अ, ब, क असे तीन भाग केले आहेत. भाग ‘अ’ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ‘समाजशास्त्राचा उदय’ हे प्रकरण नव्याने या आवृत्तीत समाविष्ट केले आहे. तसेच हर्बर्ट स्पेन्सर आणि सिमेलच्या विचारांचा समावेश केला आहे. विभाग ‘ब’ मध्ये आधुनिक समाजशास्त्रीय विचारवंत टॉलकॉट पारसन्स आणि रॉबर्ट मर्टन यांचा समावेश केला आहे. तर विभाग ‘क’ मध्ये भारतीय समाजशास्त्रीय विचारवंतांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाच्या एम्. ए. (समाजशास्त्र) च्या अभिजात समाजशास्त्रीय विचार’ (Classical Sociological Thought) या पेपरकरीता प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्रस्तुत ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे. कारण सर्व विद्यापीठातील ‘Classical Sociological Thought’ या पेपरमधील सर्वच विचारवंतांचा अंतर्भाव प्रस्तूत ग्रंथात करण्यात आला आहे.
डॉ. सरोज आगलावेची प्रस्तुत ग्रंथलेखनास मदत झाली. महाराष्ट्रातील समाजशास्त्राचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या प्रचंड प्रतिसादामुळेच समाजशास्त्रावरील ग्रंथलेखन सुरू आहे. यापुढेही त्यांचा असाच लोभ कायम राहील, हीच अपेक्षा !
Reviews
There are no reviews yet.