![Nitishastriya tatvadyan नीतिशास्त्रीय तत्वज्ञान](https://ksagaronline.com/wp-content/uploads/2022/12/Nitishastriya-tatvadyan-नीतिशास्त्रीय-तत्वज्ञान-250x380.jpg)
![Pashchatya nitishastracha itihas पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास](https://ksagaronline.com/wp-content/uploads/2022/12/Pashchatya-nitishastracha-itihas-पाश्चात्य-नीतिशास्त्राचा-इतिहास-250x392.jpg)
Bharatiya Va Pashchatya Nitishastra भारतीय व पाश्चात्य नीतिशास्त्र
₹150.00
Author : Vidya Joshi
Edition : 2014
Language : Marathi
Publisher : Vidya Prakashan / विद्या प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Bharatiya Va Pashchatya Nitishastra भारतीय व पाश्चात्य नीतिशास्त्र
लेखक : विद्या जोशी
द्यापीठ अनुदान आयोगाने समाजविज्ञान स्नातक पदवीसाठी नवीन अभ्यासक्रमाचे नियोजन सर्व विद्यापीठांकडे पाठविले. या मागील त्याची भूमिका हीच की संपूर्ण भारतात कुठल्याही अभ्यासक्रम पोहचाफार फरकाने सारखा असावा. नागपूर विद्यापीठानेही विद्यापीठ अनुदान आयोगाची ही सूचना अमलात आणली. आणि त्यानुसार समाजविज्ञान शाखेच्या सर्व विषयांचे अभ्यासक्रम २००१- २००२ पासून नवीन नेमण्यात आले. त्या आधारे २००२-२००३ या सत्रात स्नातक भाग १ (B.AI) तत्वज्ञानाच्या विषयाच्या अभ्यासक्रमात नीतिशास्त्र (Ethics) या शाखेचा समावेश करण्यात आला. तसेच प्रत्येक विषयात भारतीय आणि पाश्चात्य या दोन्ही विचारसरणीचा समावेश करण्यात यावा असा आग्रह परण्यात आला.
स्नातक भाग १ या वर्गाला भारतीय आणि पाश्चात्त्य नीतिशास्त्र नेमण्यात आले. भारतीय नीतिशास्त्रात, भारतीय नीतिशास्त्राची व्याख्या, तिचे स्वरूप, गृहीततत्त्वे, पुरुषार्थ विचार, कर्मसिद्धांत, जैन आणि बौद्धांच्या विचारांचा समावेश करण्यात आला तर पाश्चात्य नीतिशास्त्रात मील, बेंथम, कांट, व्हॉन्स, एपिफ्युरिन, ॲरिस्टीपस, अतिनितीशास्त्र यांचा समावेश केला आहे. या सर्व विषयांची माहिती एका ठिकाणी विद्याथ्र्यांना उपलब्ध व्हावी या एकमेव उद्देशाने प्रेरीत होऊन प्रस्तुत विषयाचे विवेचन या पुस्तकात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे.
या पुस्तकातील पहिल्या भागात भारतीय नीतिशास्त्राच्या नियोजित अभ्यासक्रमाचे विवेचन केले आहे आणि दुसऱ्या भागामध्ये अभ्यासक्रम समोर ठेवून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे जर अनावधानाने काही उणिवा असल्यास विद्वान मंडळींनी त्या निदर्शनास आणून द्याव्यात ही नम्र विनंती.
हे लेखन करीत असताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अनेकांचे सहकार्य लाभले. परंतु काहींचा नामनिर्देश करणे आवश्यक वाटते.
नागपूर विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागात कार्यरत असणाऱ्या डॉ. सुनिता इंगळे, डॉ. सुरेंद्र गायधने, तसेच हिस्लॉप महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाच्या विभाग प्रमुख प्रा. वंदना घुशे, विधि महाविद्यालयातील डॉ. विभा महाजनी यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने प्रस्तूत लेखन प्रपंच अधिक सुलभ झाला. तेव्हा त्यांचा ऋणनिर्देश केल्याशिवाय हे पुस्तक पूर्णत्वाला जाऊ शकणार नाही.
हे पुस्तक लिहित असताना भरपूर सहकार्य मिळाले. त्यांच्या सहकार्याशिवाय हे पुस्तक मूर्त स्वरूपात आले नसते. तेव्हा त्यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांची कायमची ऋणी आहे.
तसेच या पुस्तकाचे प्रकाशक श्री प्रमोद मुंजे यांनीही नियोजित वेळेत हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार.
प्रा. विद्या जोशी
Language |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.