Engraji Va Marathi Atyavashayak Nibandh इंग्रजी व मराठी अत्यावशक निबंध
दोन शब्द…
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुस्तक लिहिताना सर्व थरांतील विद्याथ्र्यांचा विचार करणे गरजेचे असते तसा तो येथे केला आहे. विषयाची निवड करताना जास्तीतजास्त विषयांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रामुख्याने मराठी माध्यमाच्या विद्याथ्यांना निबंधलेखनात येणाऱ्या अडचणी ध्यानात घेऊन या पुस्तकाची रचना साकारली आहे. हे पुस्तक म्हणजे मराठी निबंधांचे इंग्रजी भाषांतर नव्हे! दोन्ही भाषांतील निबंध या ठिकाणी स्वतंत्रपणे लिहिले आहेत; काही ठिकाणी निबंध विषयाची नावेही वेगळी आहेत. अर्थात, निबंध विषयाचा गाभा तोच ठेवला आहे. एकाच विषयावरील मराठी व इंग्रजी निबंधांचा आशय एकच असला तरी त्या त्या भाषेनुरूप त्यांची मांडणी केली आहे. विशेषतः इंग्रजीचा न्यूनगंड असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात मराठी निबंध व इंग्रजी निबंध एकत्र वाचल्यानंतर आत्मविश्वास निर्माण होईल व तो इंग्रजी निबंध आत्मविश्वासाने लिहू शकेल आणि त्याचवेळी मराठी निबंधांची त्याची तयारीही उत्तम होईल, असा विश्वास वाटतो. इंग्रजी व मराठी निबंधांची शैली प्रत्येक विषयाला अनुरूप असली तरी निबंध अद्ययावत व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहितीपूर्ण करण्याला महत्त्व दिले आहे.
ct.
मराठी निबंधांचे संस्करण करण्याचे कार्य स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रथितयश व व्यासंगी लेखक के सागर यांनी अतिशय उत्तमरीत्या पार पाडून निबंधांचा दर्जा व उपयुक्तता वाढविली आहे; त्यामुळे हे निबंध निश्चितच के सागरीय दर्जाचे आणि तितकेच उपयुक्त ठरतील, यात खरेतर, शंकाच नाही! डॉ. एस. बी. गोखले व प्रा. भाऊराव कुलकर्णी यांनी इंग्रजी निबंध वाचून काही मौलिक सूचना दिल्या; त्यांचे ऋण व्यक्त करणे मी माझे कर्तव्यच मानतो. मराठी निबंधांबरोबरच इंग्रजी निबंधही अधिक सुंदर बनविण्याचे कार्य के सागर यांनी मोठ्या नजाकतीनं पार पाडलं आहे. त्यांचा प्रदीर्घ लेखन प्रपंच, अखंड अक्षरयात्रा अन् शैक्षणिक विषयांचा अव्याहत व्यासंग अचंबित करणारा आहे.
स्वतः स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मान्यवर लेखक असणारे आणि सर्वस्वी या क्षेत्रालाच वाहून घेणारे व्ही. एस. क्षीरसागर तथा के सागर हे केवळ स्वतःच लिहितात असे नव्हे तर, इतरांनाही लिहितं करतात- उत्तेजन देतात. मात्र, त्यासाठी लिहिणाऱ्यासही स्वतंत्र निर्मितीची आस असावयास हवी. स्वयंप्रेरित लेखन करणाऱ्या लेखकांना त्यांच्याकडून सातत्याने प्रेरणा मिळते; हेही मला प्रकर्षाने जाणवले. त्यांच्याच सांगावयाचे तर भावलेही!
– प्रा. विजयकुमार रा. वेदपाठक
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/ 02024453065
Reviews
There are no reviews yet.