KSagar Krushivishay Ghatak कृषिविषय घटक
लेखक : के’सागरीय
कृषी अधिकारी पदाकरिता आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या २०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत कृषिविषयक घटकावर ५० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. मराठी व इंग्रजी या घटकांना प्रत्येकी ३५ गुणांचे मूल्य आहे. तर व्यापक कक्षा असलेल्या सामान्य अध्ययन या घटकास तुलनात्मकदृष्ट्या कमी म्हणजे ८० गुण आहेत. यावरून या परीक्षेतील कृषिविषयक घटकाचे महत्त्व अधोरेखित व्हावे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पहिल्या पेपरमधील भूगोल आणि कृषी घटकांतर्गतही कृषी विषयास जवळजवळ ३५ गुणांचे मूल्य दिले जाते. त्यावरून या परीक्षेतील कृषिटकाचे महत्व पुरेसे स्पष्ट व्हावे.
कृषी आयुक्तालयांतर्गत कृषिसेवक पदासाठी फक्त लेखी परीक्षा घेण्यात येते. या पदासाठी मुलाखत घेतली जात नाही. लेखी परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारेच गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाते. त्यावरून या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित व्हावे.
दोनशे गुणांच्या या लेखी परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांना प्रत्येकी २० असे एकूण ८० गुण आहेत; तर कृषी या एकाच विषयास १२० गुणांचे मूल्य आहे. त्यावरून या लेखी परीक्षेतील कृषिविषयाचे महत्त्व ध्यानी यावे.
प्रकाशनाने पूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता प्रकाशित केलेल्या ‘कृषिविषयक घटक या संदर्भाच्या सेहेचाळीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ही एकच बाब संबंधित संदर्भ अधिक व्यापक स्वरूपाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता किती उपयुक्त व विद्यार्थिप्रिय ठरला होता, हे सिद्ध करते. आपल्या कृषी अधिकारी व कृषिसेवक परीक्षांमध्ये असलेले कृषिविषयाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रस्तुतच्या संदर्भाची ही संपूर्णतया सुधारित बासष्टावी आवृत्ती नव्या स्वरूपात विद्यार्थिमित्रांच्या हाती सोपवित आहे.
प्रस्तुतच्या कृषिविषय पुस्तकाची रचना साकारताना विषय मुळातूनच समजण्यावर आणि तो अगोदरच समजला असला तर त्याची पुन्हा उजळणी
होण्यावर विशेषत्वाने भर दिला आहे. जवळपास दीड हजार वस्तुनिष्ठ प्रश्न स्वतंत्रपणे दिले आहेत. विषयाची रचना साकारताना एक सिक्वेन्स
साधला असून सोयीसाठी आपल्या अभ्यासक्रमाची एकूण सात प्रकरणांत विभागणी केली आहे. प्रत्येक प्रकरणात महत्त्वाचे व संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न अंतर्भूत केले आहेत. याशिवाय, ‘संकीर्ण व महत्त्वाचे’ हे आठवे विशेष प्रकरण पुस्तकात समाविष्ट केले असून नवव्या प्रकरणात संमिश्र व महत्त्वाचे असे जवळ जवळ पाचशे वस्तुनिष्ठ प्रश्न दिले आहेत. दहाव्या प्रकरणात प्रत्येकी चाळीस गुणांच्या बारा आदर्श प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. ही तीन प्रकरणे, अधूनमधून दिलेल्या तळ चौकटी व स्पष्टीकरणे हा या ग्रंथाचा एक गुणविशेष ठराया. कृषिविषयक घटकावरील अनेक पुस्तके या आद्य ग्रंथावर आधारलेली आहेत, हा या ग्रंथाचा आणखी एक विशेष होय.
पुस्तकाची उपयुक्तता, गुणवत्ता व परीक्षा- भिमुखता वाढविण्याचा के’सागरीय अट्टाहास या पुस्तकाच्या पानापानांतून आपणास प्रतीत व्हावा ही अपेक्षा!
या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची रचना करताना गुरुवर्य डॉ. मा. पं. धोंगडे (दिवंगत) व डॉ. रघुनाथराव वाघमारे या कृषिक्षेत्रातील ज्येष्ठ व व्यासंगी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सहकार्य मला लाभले होते. या पुस्तकाच्या प्रत्येक सुधारित, विस्तारित व अधिकाधिक उपयुक्त आवृत्त्यांची रचना करताना या दोहोंच्या मार्गदर्शनातून साकारलेला मूळ आराखडा प्रत्येक वेळी उपयुक्त उरला आहे. त्या पायावरच बासष्ट आवृत्त्यांच्या बासष्ट इमल्यांची ही गगनचुंबी इमारत आज उभी आहे. या दोन्ही गुरुवर्यांच्या ऋणांत राहणेच मला गौरवास्पद वाटत असले तरी त्याचा निर्देश करणे, हे मी माझे कर्तव्यच समजतो.
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.