Mi Ek Swapn Pahil Dr.Rajendra Bharud IAS
वादळ वाऱ्यांनी घोंघावणाऱ्या माझ्या जीवनात एखाद्या पुस्तकाची निर्मिती होईल, असे मला स्वप्नातही वाटत नव्हते. २०११-१२ साली जेव्हा यु.पी.एस.सी.च्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालो, त्यावेळी दीपस्तंभचे कार्यकारी संस्थापक व माझे जवळचे मित्र श्री. यजुर्वेद्र महाजन सर यांनी मला माझे आत्मचरित्र लिहिण्यास सूचविले. पण मी त्यांना सांगितले की, आत्मचरित्र लिहिण्याएवढा मी मोठा माणूस नाही. माझ्या जीवनात आत्मचरित्र लिहिण्यासाठी असे काही महान कार्यही मी केले नाही. पण सरांनी म्हटले की, तुझा जीवनप्रवास ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणांना प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे आपण स्वतः साठी नाही, तर दुसऱ्यांसाठी लिहू.
मी सरांना त्यावेळी नाही म्हटले; मात्र २०१२-१३ मध्ये पुन्हा यु.पी.एस.सी. उत्तीर्ण झालो. व आय.ए.एस. पद मिळाले. मग मात्र मी सरांचा संकल्प मनाशी धरून पुस्तक लिहिण्यास सुरूवात केली. सरांनीच मी लिहिलेले पहिल्यांदा वाचून काढले व त्यात योग्य ते बदल सूचवले. म्हणून या पुस्तकाची संकल्पना व निर्मिती केल्याबद्दल श्री. यजुर्वेद्र महाजन सरांचे मी विशेष आभार मानतो.
हे पुस्तक निर्दोष व्हावे, म्हणून पुस्तकाचे संस्करण व त्यामधील विशेष शब्दांची ठेवण करण्याचे काम माझे मित्र श्री. मनोज गोविंदवार यांनी अत्यंत उत्साहीरित्या आणि कौशल्यपूर्ण पार पाडले. म्हणून मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. त्यासोबतच श्री. अमोल महाजन, ज्यांनी पुस्तकाची सजावट व मांडणी केली त्यांचेही मी आभार मानतो. या पुस्तकाच्या लिखाणाचे शिवधनुष्य पेलण्याचे काम माझ्या परिवाराचे घटक असणारे दोंडाईचा येथील श्री. डॉ. अशोक मंडाले काका, सौ. अनिता मंडाले मावशी, त्यांची दोन्ही मुले अनिकेत व आशीष यांनी केले. या परिवाराने माझ्या आयुष्याची भावकहाणी फारच जवळून पाहिली असल्यामुळे त्यांनी लिखाणास फारच मदत केली. त्यांचे मी विशेष आभार मानतो..
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.