Dnyandeep Sanyukt Mukhya Pariksha Prashnapatrika Vishleshan ( 2013-2023 ) GAT-B , GAT-C
Dnyandeep PSI-STI-ASO-ExSI Mukhya Prashnapatrika Vishleshan Bhag- 2013-2023
मनोगत
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या युवा वर्गात सर्वाधिक आकर्षण असलेले पोलिस उपनिरीक्षक तसेच राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क व वर्ग क च्या इतर पदे लिपीक टंकलेखन, कर सहाय्यक द उद्योग निरीक्षक व तांत्रिक सहाय्यक या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी याआधी मुख्य परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा आवाका समजून घेण्यासाठी प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय विश्लेषण करणे अत्यावश्यक आहे.
या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला इतरांच्या पुढे राहण्यासाठी काहीतरी विशेष करावे लागेल. यासाठी आपण पुढील पद्धतीने स्ट्रॅटेजी तयारी करणे गरजेचे आहे.
1) प्रश्नांचे विश्लेषण करणे.
2) चालू घडामोडी अपडेट करणे.
3) खुप साऱ्या प्रश्नांचा सराव करणे…
यामधील वरीलपैकी पहिल्या व तिसऱ्या मुद्दयासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आम्ही या पुस्तकात तसा विशेष प्रयत्न केला आहे. – एखाद्या प्रश्नाचा Current शी काय संबंध आहे?
– अभ्यासक्रमातील कोणत्या मुद्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता अधिक आहे? यापुढे जास्तीचा काय अभ्यास करावा आणि कसा करावा ?
या सर्व प्रश्नाची उत्तरे व अभ्यासाचे स्वरूप यांना एक दिशा येण्यासाठी मागील काही वर्षामध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषणासह स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न आम्ही याद्वारे विद्यार्थ्यांना आपला अभ्यास कोणत्या पद्धतीने करणे, किती करणे व कोणत्या मुद्यावर Focus करणे याचा अंदाज येईल..
लाखो परीक्षार्थी बसणाऱ्या या परीक्षांत यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी या पुस्तकाची आपणास नक्कीच मदत होईल.
या पुस्तकाच्या लिखाणासाठी आम्हास प्रोत्साहन, मार्गदर्शन तसेच सर्व प्रकारची मदत केल्याबद्दल श्री. महेश राजाराम शिंदे (संचालक, ज्ञानदिप अॅकडमी) व श्री. उमेश राजाराम शिंदे यांचे मनापासून आभार मानतो.
सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना पुढील परीक्षांसाठी हार्दिक शुभेच्छा !
आपलाच, श्री. अमोल दबडे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.