Dnyandeep Buddhimapan Chachani aani Ankaganit Vishleshan, ज्ञानदीप बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित विश्लेषण
लेखक : सुशांत सुरेखा लक्ष्मण शिंदे
मनोगत
MPSC च्या प्रत्येक परीक्षेमध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक आयोगाचा Syllabus ज्याच्यामधून प्रश्न येतात Syllabus च्या व्यवस्थीत अभ्यास केला तर प्रश्नपत्रिकेचा आवाका कळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न. हे प्रश्न जर आपण पाहिले तर येणाऱ्या प्रश्नांचे स्वरुप आपल्याला कळते. त्यामुळे Syllabus मधील कोणत्या मुद्याला किती महत्त्व आहे. प्रत्येक मुद्यावर किती प्रश्न येतात व कोणत्या प्रकारचे होतात. किती प्रमाणात प्रश्न Repeat होतात. हे आयोगाचे प्रश्न पाहून कळते. म्हणून MPSC च्या कोणत्याही परीक्षेत पास व्हायचे असेल तर सर्व प्रथम Syllabus व त्यानंतर त्यावर आधारित आयोगाचे प्रश्न माहित असणे आवश्यक आहे.
हाच धागा पकडून सन 2010 ते 2019 पर्यंतच्या PSI, STI, ASO. Clerk, Typing • Assistance च्या पूर्व व मुख्य परीक्षेतील सर्व गणिते व त्यांचे विश्लेषण गणित व बुद्धीमत्ता या प्रकारांमध्ये मी व माझे सहकारी धनंजय उंडे सर आणि दिपक पवळ सर यांनी केले आहे. हे पुस्तक अधिकाधिक चांगले व्हावे म्हणून रणजित कबडे, सुभाष साबळे व गोपिचंद यांची देखील मोत्याची मदत झाली. विविध पुस्तक लिहिण्यासाठी ज्ञानदीपचे सर्वेसर्वा महेश शिंदे सर, उमेश शिंदे सर व नितेश सर यांनी नेहमीप्रमाणे यावेळीही प्रोत्साहित केले, त्यांचे मनापासून आभार.
तुम्हा सर्वांना येणाच्या परीक्षांमध्ये या पुस्तकाची खूप मोलाची मदत गणिताची तयारी करताना होईल यात शंका नाही.
शुभेच्छा !!!
सुशांत सुरेखा लक्ष्मण शिंदे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.