Yugpravartak Chhatrapati Shivaji Maharaj Vasudeo Krishna Bhave Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज
₹399.00 Original price was: ₹399.00.₹319.00Current price is: ₹319.00.
Author : Vasudeo Krishna Bhave
Edition : 1 ed 2025
Language : Marathi
ISBN : 9789347527678
Publisher : Krishna Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Yugpravartak Chhatrapati Shivaji Maharaj Vasudeo Krishna Bhave Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज
प्रयोजन
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम् ।
कालिदास
‘के – सरी’च्या संपादक-वर्गातून निवृत्त झाल्यानंतर माझा नित्याचा लेखनव्यवसाय सुटला. थोडी वर्षे विश्रांती घेतल्यावर मेंदूत पुनः शक्ती आली, आता सारा वेळ मोकळा, तो कसा घालवावा हा प्रश्न पडला. तेव्हा वेळ जाण्याकरिता अनेक विषयांवरील ग्रंथांचे परिशीलन केले व काही ग्रंथ लिहूनही तयार ठेवले. पण देशाची आर्थिक स्थिती युद्धोत्तर काळात इतकी बिघडली की, कोणीही प्रकाशक कोणतेही पुस्तक हाती घ्यायला धजेना. मला तर वेळ घालवायला काही साधन पाहिजेच होते. अशा मनःस्थितीत शिवचरित्राकडे सहज लक्ष गेले. मला विषय असा हवा होता की, ज्यात उरलेल्या आयुष्याचा बराच काळ जाईल. तसा हा विषय होता.
इंग्लिश चरित्रे
पुण्यातील भारत-इतिहास संशोधक मंडळात माझे नेहमी जाणे असे. त्यात शिवकालीन पत्रसारसंग्रहाचे तीन खंड असल्याचे मी ऐकले होते. पैकी पहिले दोन खंड इ. स. १९३० साली व तिसरा खंड इ. स. १९३७ साली प्रसिद्ध करण्यात आला होता. या तीन खंडांत मिळून २८०० पत्रांचे सार आहे. मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषांत श्रीशिवछत्रपर्तीची अनेक लहान-मोठी चरित्रे झालेली आहेत. इंग्लिशमध्ये बंगालचे प्रसिद्ध इतिहासकार सर जदुनाथ सरकार, कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजाचे प्रिन्सिपाल कै. डॉ. बाळकृष्ण, कै. चिंतामण विनायक वैद्य आणि कै. कृष्णराव अर्जुन केळुसकर व कै. नीलकंठ सदाशिव ताकखाव, एम. ए.. या दोघांनी मिळून लिहिलेले, अशी चरित्रे प्रसिद्ध असून त्यांपैकी सर जदुनाथ सरकार यांनी लिहिलेल्या चरित्राने विशेष नाव मिळवले आहे. त्याची इंग्लिश जाणणाऱ्या वाचकात इतकी प्रसिद्धी झाली की, त्याच्या आतापर्यंत चार आवृत्त्या निघाल्या. डॉ. बाळकृष्ण यांचे चरित्र त्याहून मोठे म्हणजे दोन खंडात आहे. केळुसकर व ताकखाव या दोघांनी लिहिलेले चरित्र डॉ. बाळकृष्णकृत चरित्रापेक्षा
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.