

Yayati ययाति – वि.स. खांडेकर
₹375.00 Original price was: ₹375.00.₹318.75Current price is: ₹318.75.
Author : V.S.Khandekar
Edition : 2022
ISBN : 9788171615899
Language : Marathi
Publisher: : Mehta Publishing House / मेहता पब्लिशिंग हाउस
Title Name : Yayati ययाति – वि.स. खांडेकर
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Yayati ययाति – वि.स. खांडेकर
वि.स. खांडेकर (Vishnu Sakharam Khandekar )
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील ‘ययाति’ चे स्थान
मेरुमण्यासारखे आहे. या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत. आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्यभीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच, ते दुसऱ्या दृष्टीने ते चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच ‘ययाति’ च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.
कामुक, लंपट, स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वतःच्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातीवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध रूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. ‘ ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे, शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,’ अशी अपेक्षा स्वतः खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.