Environment- Shankar IAS For UPSC And State Civil Services Examinations
Environment- Shankar IAS For UPSC And State Civil Services Examinations Original price was: ₹750.00.Current price is: ₹638.00.
Back to products
Jivansetu (जीवनसेतु)-Setu Madhavrao Pagdi Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
Jivansetu (जीवनसेतु)-Setu Madhavrao Pagdi Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal Original price was: ₹550.00.Current price is: ₹495.00.

Vyaktirang Mi Pahilele ( मी पाहिलेले )-Kumar Saptarshi Marathi Book katha-kadambari (Novel) Continental

Original price was: ₹350.00.Current price is: ₹315.00.

Author           :    Kumar Saptarshi

Edition          :     2 ed

Language    ‏  :     Marathi

ISBN               :    9788195063888

Publisher      :    Continental Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Vyaktirang Mi Pahilele ( मी पाहिलेले )-Kumar Saptarshi Marathi Book katha-kadambari (Novel) Continental

मनोगत

जीवनात अनेकविध प्रसंग येतात. त्यापैकी काही खळबळजनक तर काही आयुष्याला वळण देणारे असतात. काहींचा सुगंध मनात दरवळत राहतो. आयुष्य पुढे जात राहते. काही माणसे, प्रसंग मात्र विसरता येत नाहीत. त्यांच्या आठवणी मनात घर करून राहतात. कुपीत ठेवलेल्या अत्तरासारख्या !

सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात खाजगी गोष्टी कमी असतात. जे प्रसंग कोणाच्याही जीवनात घडू शकतात अशा गोष्टी ऐकण्यात सर्वांना रस असतो. विशिष्ट प्रसंगी अमुक एक व्यक्ती कशी वागली, तिने त्या प्रसंगाला कसे तोंड दिले, त्या अनुभवातून सार काय काढले, ती व्यक्ती काय शिकली या गोष्टींमध्ये लोकांना स्वारस्य असते. दुसऱ्यांचे अनुभव ऐकताना तेही समृद्ध बनतात. लेखकाच्या कथनातून आपल्या जीवनाला सामोरे जाण्यासाठी वाचक अधिक समर्थ बनत असेल तर त्याला साहित्य म्हणतात. आयुष्य अल्प असल्याने कुणाला केवळ स्वानुभवावर अवलंबून राहता येत नाही.

ज्या आठवणी मनातून लुप्त होत नाहीत त्या लोकांना निवांतपणे सांगाव्यात असे वाटत होते. त्यातून या पुस्तकाला आकार आला. यात माझ्या व कदाचीत त्यांच्याही आठवणीतली माणसे वाचकांना भेटतील. त्यांना मी जसे पाहिले, जसे ते मला दिसले, त्यांच्याकडून जे अनुभवले ते सारे यात सांगितले आहे. त्यांच्याकडून जे मिळाले ते वाटून टाकलेच आहे. प्रस्तुत पुस्तकात त्यांचे संपूर्ण चरित्र अथपासून इतिपर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही. लेखकाची भूमिका चरित्रकाराची नाही. जेवढे लोक परिचयाचे आहेत ते सारे या ग्रंथात आलेले नाहीत. जे पुस्तकात आले नाहीत अशांची संख्या मोठी आहे. हे आत्मचरित्र नव्हे. या माझ्या आठवणी आहेत. हा आठवणींचा

खजिना मोलाचा वाटला. म्हणून वाचकांसमोर तो उघडा केला एवढेच! यात बरीच प्रसिद्ध माणसे आहेत. कदाचित इतरांना ती वेगळी दिसत असतील. हे शक्य आहे. ज्यांनी आयुष्याला वळण लावले असे लोक यात आहेत. व्यक्तिशः मला ते महान वाटतात. काही अपरिचित लहान माणसे देखील यात आढळतील. त्यांच्या आठवणी महत्त्वाच्या वाटल्या म्हणून त्यांच्याबद्दल लिहिले आहे.

साचेबंद विचारसरणीतून लिखाण केलले नसले तरी लेखकाची जीवनदृष्टी बाजूला काढून ठेवता येत नाही. मोठ्या पदावर असलेल्या माणसांबद्दल साधारणतः सर्वांनाच कुतूहल असते. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा असते. मला थोरल्या बंधुसमान असलेल्या पंतप्रधान चंद्रशेखरजी यांच्याबद्दल या पुस्तकात लेख कसा नाही असा प्रश्न काही वाचकांना पडेल. पण काही वर्षांपूर्वीच माझे ‘चंद्रशेखर’ या नावाचे त्यांच्या आठवणींचे स्वतंत्र पुस्तक प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्राच्या चार माजी मुख्यमंत्र्यांबद्दल माझे आकलन या पुस्तकात मांडले आहे. त्यांच्याबद्दल अनेक लेख व गौरव ग्रंथ प्रकाशित झाले असतील. तरीही माझे व्यक्तिगत आकलन मराठी वाचकांसमोर मांडावेसे वाटले. प्रत्येक चित्रात चित्रकाराने वापरलेले रंग वेगळे असू शकतात. त्यामुळे त्यांच्या मोठेपणाला यत्किंचितही धक्का पोहोचत नाही.

आजवरच्या आयुष्यात जगाचे अनेक रंग पाहिले. अजून कितीतरी न पाहिलेले रंग नक्की शिल्लक असतील. ज्ञातापेक्षा अज्ञाताचे क्षेत्र अमर्याद व अनंत असते. ज्ञान व आयुष्य दोन्ही मर्यादित असते हे वास्तव आहे. आव्हाने निर्भयपणे स्वीकारली तरच आयुष्य प्रकाशमान होते. धमाल जगता आले तर लाभलेल्या आयुष्याला दीर्घायुष्य म्हणता येते. मर्यादांवर मात केल्याचा भाव मनात आयुष्याच्या सांजपर्वात शिल्लक राहतो. मनात साचलेला सुगंधी दरवळ वाचकांसाठी उघडा करताना आनंद द्विगुणित होतो. एकूणात काय…. आपल्या मनातला हा दरवळ दाही दिशांना उधळून टाकण्यात पुनःपुन्हा जगण्याची धमाल अनुभवता येते.

 

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.