Vishavrikshachi Chhaya (विषवृक्षाची छाया )- Vasant Kanetkar Marathi Book katha-kadambari (Novel)

80.00

Author           :       Vasant Kanetkar 

Edition          :         2 ed

Language    ‏  :        Marathi

ISBN               :        9788171856718

Publisher      :        Popular Prakashan 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Vishavrikshachi Chhaya (विषवृक्षाची छाया )- Vasant Kanetkar Marathi Book katha-kadambari (Novel)

“… विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, सुरेश खरे, शं. ना. नवरे इत्यादी सर्व नाटककारांपेक्षाही, ज्यांचे नाट्यकर्तृत्व अधिक भव्य आणि लक्षणीय आहे, असा आजचा अग्रगण्य नाटककार म्हणजे वसन्त कानेटकर होय. त्यांच्या नाटकांची एकूण संख्या लक्षणीय असली, तरी संख्येपेक्षा त्यांची नानाविधता व नाट्यगुणवत्ता अधिकतर लक्षणीय आहे. प्रस्तुत संबंधात एक साधा प्रश्न विचारून बघण्यासारखा आहे, की ज्याने कानेटकरांप्रमाणे अनेक नाट्यविशेषांत आपले विजयस्तंभ उभारून ठेवले आहेत, असा अन्य कोण नाटककार आहे? या एका बाबतीत तर अखिल मराठी नाट्येतिहासात त्याचे महत्त्व केवळ अनन्यसाधारण असे आहे. पूर्वोक्त आणि तत्पूर्व किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, खाडिलकर, गडकरी हे सर्व नाटककार प्रायशः एकदेशी होते तर कानेटकर अनेकदेशी आहेत. उदाहरणार्थ, ‘मत्स्यगंधा’सारखे पौराणिक, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’सारखे ऐतिहासिक, ‘प्रेमा तुझा रंग कसा? ‘सारखे सामाजिक, ‘वेड्याचं घर उन्हात ‘सारखे मनोवैज्ञानिक, ‘देवाचं मनोराज्य’सारखे काल्पनिक आणि ‘हिमालयाची सावली’सारखे चारित्रिक, अशी अनेक व अनेकविध नाटके रचणारा अन्य कोण मोठा नाटककार आहे? आणि त्याशिवाय ट्रेजिडी, कॉमेडी, ट्रॅजिकॉमेडी, फार्स इत्यादी सर्व नाट्यप्रकारांत त्यांचे काही ना काही अजोड असे नाट्यकर्तृत्व आहेच. तेव्हा हा एक पराक्रमी नाटककार असा आहे की ज्याने मराठी नाटक पूर्वी कधी नव्हे इतक्या उंचीवर नेऊन पोचवले असे म्हणता येईल. ‘कस्तुरीमृग’सारखी मराठी नाटकाला ललामभूत ठरेल, अशी एक अस्सल ट्रेजिडी कानेटकरांनी लिहिली आहे. पूर्वकाळात एकूणच मराठी नाटकाची आणि येथे ‘नाटकाची’ म्हणजे ‘भराठी नाट्यलेखनाची’ जी रड आणि परवड होती ती लक्षात घेता कानेटकरांचे नाट्यलेखन केवळ विस्मयजनक आहे, असे म्हणणे प्राप्त आहे…”

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.