Back to products
Sthanik Swarajya Sanstha : Sanrachana Aani Vyavahar
Sthanik Swarajya Sanstha : Sanrachana Aani Vyavahar Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00.

Vikasache Samajshastra विकासाचे समाजशास्त्र

Original price was: ₹180.00.Current price is: ₹135.00.

Author          :    Subhash Sharma

Edition          :    2017

Language ‏    :    Marathi

Publisher: ‎   :   Unique Academy

 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Vikasache Samajshastra विकासाचे समाजशास्त्र

सुभाष शर्मा

विकास म्हणजे नियोजित बदल. शहरांच्या आणि गावांच्या विकासाचे वादळ चोहीकडे दिसून येते, परंतु विकासविषयक संकल्पना अनेकविध असून त्या परस्परविरोधीही आहेत. काँक्रिटची जंगले तयार करणे म्हणजे विकास का? नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण म्हणजे विकास का? दुर्दैवाने, नवपुराणमतवादी अर्थशास्त्रज्ञ विकास या संकल्पनेला आर्थिक वृद्धीपुरतेच मर्यादित ठेवतात आणि आर्थिक विकासदर, एकूण देशांतर्गत उत्पादन, दरडोई उत्पन्न, देशव्यापी यंत्रणा, मोठ्या धरणांची आणि मोठमोठ्या प्रकल्पांची उभारणी, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अधिकाधिक वापर, बाजारपेठेतील मागणी-पुरवठ्याच्या आधारे वस्तुंची मूल्यनिश्चिती, खुली स्पर्धा इ. संकल्पनांवर जोर देताना दिसतात. जागतिक बँक आणि विकासविषयक जागतिक अहवालांतील विकासविषयक संकल्पनाही कमीअधिक फरकाने अशीच आहे. मनुष्याचे हित आणि विकासाला मानवी चेहरा देण्याचा मुद्दा अधोरेखित करत अर्मत्य सेन यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञ उत्पन्न, दीर्घायुष्य (वाढते आयुर्मान) आणि शिक्षण यांवर जोर देतात. अर्थात, ते आर्थिक वृद्धीबरोबरच आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या सामाजिक पैलूंनाही तितकेच महत्त्व देतात. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमही (UNDP) याच संकल्पनेचा पुरस्कार करताना दिसतो. विकासविषयक तिसऱ्या संकल्पनेमध्ये विकासाची संकल्पना ही उत्पादनाची साधने आणि त्यांच्यातील परस्परसंबंध यांमधील पायाभूत बदलांना महत्त्व देते. ही मार्क्सवादी संकल्पना आहे, परंतु उत्पादनसाधनांच्या सामूहिक मालकीसारख्या समाजवादी व्यवस्था सोव्हिएट रशिया आणि अनेक पूर्व युरोपीय राष्ट्रांमध्ये उद्ध्वस्त झाल्याने ही संकल्पना व्यवहारात प्रत्ययास येत नाही. प्रस्तुत लेखकाने विकासविषयक चौथी संकल्पना सादर केली आहे. यामध्ये मुख्यतः पर्यावरणाकडे लक्ष वेधून घेत शाश्वत विकासाची प्रक्रिया सुरू करावी, लोकशाही प्रक्रियांचा आधार घेत लोकांचा सहभाग निश्चित करावा, पुढच्या पिढ्यांच्या हितांची काळजी घेतली जावी आणि छोटया छोटया गोष्ट सौंदर्यही लक्षात घेतले जावे, या मुद्द्यांचा समावेश केला आहे.

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.