

Vachat Sutalo Tyachi Gosht (वाचत सुटलो त्याची गोष्ट)-Niranjan Ghate Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
₹300.00 Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00.
Author : Niranjan Ghate
Edition : 3 ed
Language : Marathi
ISBN : 5672
Publisher : Samakaleen Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Vachat Sutalo Tyachi Gosht (वाचत सुटलो त्याची गोष्ट)-Niranjan Ghate Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
मनोगत
▶ मी लेखक आहे आणि माझी १८० हून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांनी मला पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठाही मिळवून दिली आहे; पण तरीही मी स्वतःला मुळात वाचक मानतो. कारण मी लेखक झालो ते या वाचनामुळेच.
लहानपणी मी फार लवकर वाचायला सुरुवात केली असं माझी आई सांगायची.
अगदी वयाच्या पाचव्या वर्षीच मी वाचायला लागलो होतो. तेव्हापासून मी अक्षरशः वाचत सुटलो आहे. गेल्या उण्यापुऱ्या सत्तर वर्षांमध्ये मी मराठी-इंग्रजी भाषेतलं, विविध विषयांमधलं उभं आडवं बरंच काही वाचलं आहे. आजही वाचतो आहे.
माझ्या वाचनाला कोणताही विषय वर्ज्य नाही. पुस्तकं नियतकालिकं मिळवण्यासाठी नव्या-जुन्या (बहुतेकदा जुन्याच !) पुस्तकांच्या दुकानांत खेपा मारणं, जिथे जसा वेळ मिळेल तसा पुस्तकांचा फडशा पाडणं, त्यातून कळणाऱ्या नव्या संदर्भासाठी आणखी नवी पुस्तकं शोधणं आणि या वाचनातून जे उलगडलंय ते वाचकांना सांगण्यासाठी लिहून काढणं, या साऱ्या उपद्व्यापानेच माझं आयुष्य व्यापलेलं आहे. त्यामुळे एका अर्थाने माझ्या वाचनाचा प्रवास हाच माझ्या आयुष्याचा प्रवास आहे. पुस्तकप्रपंच हाच आयुष्याचा प्रपंच होऊन बसला आहे. सुदैवाने मला बायकोही वाचणारी आणि माझं वाचनवेड समजून घेणारी मिळाल्यामुळे हा प्रपंच सुखाचाही झाला आहे.
माझ्या आयुष्यातील वाचनप्रवास मी या पुस्तकात लिहिला आहे. अर्थातच हे माझं आत्मचरित्र नव्हे. वाचनप्रवास सांगताना ज्या वैयक्तिक गोष्टी ओघाने आल्या तेवढ्याच या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. आयुष्यभर वाचत असताना मला जे जे नवं आढळलं ते मी त्या त्या वेळी लिहीत आलो आहे. त्यातून पाचेक हजारांहून अधिक लेख मी लिहिले असतील. पण तरीही या वाचनप्रवासातलं खूप काही अजून सांगण्याजोगं आहे. वाचन म्हणजे घरबसल्या जगप्रवास करणं आहे असं मला वाटतं. वाचनातून आपल्या जग कळतं. जगाचा इतिहास-भूगोल कळतो, संस्कृती कळते. जगाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन कळतात. जग आपल्यापरीने घडवणारी माणसं कळतात. त्यातले वाद-प्रतिवाद कळतात. जग नावाच्या गोष्टीचा वेगळाच आवाका
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.