

Tin Paishacha Tamasha (तीन पैशाचा तमाशा)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (novel)
₹140.00 Original price was: ₹140.00.₹119.00Current price is: ₹119.00.
Author : P.L.Deshpande
Edition : 9 ed
Language : Marathi
Publisher : Mouj Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Tin Paishacha Tamasha (तीन पैशाचा तमाशा)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (novel)
जर्मन नाटककार बेश्टच्या ‘थी पेनी अंऑपरा’ ह्या नाटकावरून मी हा ‘तीन पैशाचा तमाशा’ रचला आहे. बेश्टच्या नाटकांचे रचनेच्या दृष्टीने मराठी तमाशाशी जवळचे नाते आहे.
बेश्टने रंगभूमीला लोकशिक्षणाचे साधन मानले. नाटकी रम्यवादातून मुक्त केले; पण मनोरंजनाशी नाते तोडले नाही. संगीत, नृत्य, विनोद अशा नाटकाच्या रंजकतेत भर घालणाऱ्या घटकांचे वैचारिक गांभीर्याच्या नावाखाली उच्चाटन केले नाही.
नाटककार, दिग्दर्शक, कवी, संगीतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक बेश्ट हा मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाला होता. उपाशीपोटी नीती, संस्कृती वगैरे परवडत नाहीत हे त्याला पक्के उमजले होते. मार्क्स म्हटले की, काही लोकांच्या मनात उगीचच किल्मिषे निर्माण होतात.
त्यांना लगेच प्रचारकी साहित्य, बोधवाद वगैरेची आठवण होते. ललित साहित्यातून बोध झालाच पाहिजे आणि बोध होताच कामा नये अशा दोन टोकांच्या भूमिकांवरून वाद चालू असतात. कमकुवत प्रतिभेच्या लेखकाच्या कृतीतला बोध आणि कला दोन्ही कमकुवत असतात. मग तो मार्क्सवादी लेखक असो की मार्क्सविरोधी असो. बेश्टसारखा असामान्य प्रतिभेचा माणूसच शिक्षण आणि रंजन यांतला समतोल राखू शकतो.
जीवनात कला जो आनंद किंवा उल्हास निर्माण करतात त्याला बेश्टने कधीही गौण मानले नाही. नाटकाला त्याने ‘खेळ’च मानले. “No matter how fearful the problems they handle, plays should always be playful.” हे त्याचे उद्गार ध्यानात घेण्यासारखे आहेत. आणि असा हा खेळकरपणा त्याच्या सर्व नाट्यकृतींतून दिसतो. बेश्ट कवी होता. नाजुकतेचे व सुंदरतेचे त्यालाही आकर्षण होते. पण त्याला ‘मेजाशी खेचून लेखनाला प्रवृत्त करीत होती’ ती मात्र माणसांच्या दुनियेत सत्ता आणि संपत्ती मिळविण्यासाठी चालणारी अमानुषता. त्यातून निर्माण होणाऱ्या दुःखाविषयीची सहानुभूती ही त्याची मूळ प्रवृत्ती. ‘थी पेनी ऑपेरा’ ही त्याच्या ह्या मूळ प्रवृत्तीतून उभी राहिलेली नाट्यकृती आहे. समाजातल्या उपेक्षित आणि काही प्रमाणात अभागी अशा जीवांची कथा त्याने आपल्या खास नाट्यशैलीला अनुसरून हसवीत, गाणी गात, भेदकं थट्टा करीत सांगितली आहे.
पूर्व बर्लिनमधल्या ‘बेर्लिनेर आंसांब्ल’ ह्या बेश्टने उभारलेल्या नाटक मंडळीने त्यांच्या थिएटरात केलेल्या त्याच्या नाटकांचे काही प्रयोग पाहण्याची मला संधी लाभली. रंगभूमीसाठी आयुष्य वाहणारे कलावंत स्त्रीपुरुष त्या नाट्यगृहात साऱ्या जगातल्या नाट्यप्रेमी स्त्रीपुरुषांना मंत्रमुग्ध करीत असतात. त्या रंगमंदिराचा आणि कलावंतांचा आर्थिक भार त्यांचे सरकार वाहत असते. तसले पाठबळ नसूनही पुण्यातल्या थिएटर अॅकॅडेमीतल्या माझ्या कलाप्रेमी मित्रमैत्रिणींनी हा ‘तीन पैशाचा तमाशा’ रंगभूमीवर आणण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांबद्दल मो त्यांचा आभारी आहे.
-पु० ल० देशपांडे
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.