Back to products
NIKITA MH-TET & CTET Sampoorna Balmanasshastra Va Adhyapanshastra
NIKITA MH-TET & CTET Sampoorna Balmanasshastra Va Adhyapanshastra Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00.

TET – Paper -I Pradnya 14 Prashanpatrik Sanch Rajendra Dhakane, Manoj Madhukarrao Gavare Nikita

Original price was: ₹350.00.Current price is: ₹245.00.

Author          :       Rajendra Dhakane, Manoj Madhukarrao Gavare 

Edition         :      4 ed 2026-27

ISBN             :       040226112024

Language    ‏ :       Marathi

Publisher     :       Nikita Publication Latur

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

TET – Paper -I Pradnya 14 Prashanpatrik Sanch Rajendra Dhakane, Manoj Madhukarrao Gavare Nikita

प्रास्ताविक

जगामध्ये अशा तीनच गोष्टी आहेत. ज्या इतरांना दिल्याने वाढतात ते म्हणजे प्रेम, कला आणि ज्ञान. मग, मी करत असलेला अभ्यास माझ्यापुरता सीमित न ठेवता स्पर्धा परीक्षेसाठी दिवस रात्र झटून आपल्या परिस्थितीशी रोज दोन हात करणाऱ्या सर्वांनाही या अभ्यासाचा फायदा होईल यातूनच मनामध्ये या पुस्तकाचा विचार डोकावला.

2013 पासून होऊ घातलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल हा अगदी पाच ते सहा टक्क्यांत दरवर्षी लागतो, त्याचे मुख्य कारण म्हणजे अवघड परीक्षा पद्धत व विद्यार्थ्यांचा झालेला कमी सराव. हाच विचार समोर ठेवून, विद्यार्थ्यांना कमी वेळात जास्त सराव व्हावा व ज्ञानाचे आकलन होऊन ते परीक्षेत कसे उपयोजनात्मक बनवावे यासाठीच हा स्पष्टीकरणात्मक संच बनविला आहे. यातून विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाला एक ठराविक गती व दिशा नक्कीच प्राप्त होईल.

“There are better starters than me, but I am good finisher. – Usain Bolt”

हाच विचार परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला खूप महत्वाचा ठरतो. अशा वेळी अवांतर वाचन टाळून पाठांतरावरचा भार कमी करून वस्तूनिष्ठ पद्धतीने अचूकता साध्य करण्यासाठी अधिकाधिक प्रश्नपत्रिकेतील सराव हीच यशाची गुरूकिल्ली ठरते.

श्री. राजेंद्र ढाकणे सर यांच्याशिवाय हे पुस्तक सहज शक्य तर नव्हतेच. सरांनी केलेले मार्गदर्शन व प्रोत्साहन निदान शब्दांत तरी व्यक्त करणे कठीणच. सदर पुस्तकातील गणित विभाग त्यांनी विद्यार्थ्यांसमोर अगदी सोप्या शब्दांत मांडला आहे. स्नेहा जैन मॅडम यांचेही मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले. त्यांच्याही अनुभवाचा नक्कीच फायदा झाला. त्याच वरोवर निकिता प्रकाशनचे सर्वेसर्वा मा. नरेंद्रजी गटागट यांच्या गुणवत्तेची पारख करणाऱ्या अनुभवामुळे व माझ्यावर त्यांनी टाकलेल्या विश्वासामुळेच हे काम मी पुर्णत्वास नेऊ शकलो. त्यामुळे यांचेही खूप खूप आभार !!

ज्यांनी मला लहानपणापासून सांभाळले असे माझे आजोबा श्री. बब्रुवान बाबुराव बंडापल्ले व ज्यांनी मला घडवलं ते माझे आजोबा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते मा. श्री. श्रीरंगराव बाबुराव बंडापल्ले, यांनी जर माझ्या पंखात बळ भरल नसतं तर कदाचित आजची ही भरारी घेताच आली नसती. तरी तुमचे नाव न घेता या पुस्तकाला पूर्णत्य प्राप्त होणारच नाही !!

‘नशीवाला भाव देण्यापेक्षा कर्तृत्वाला वाव द्या..!’ असे म्हणत मला नेहमी पुस्तक लिहण्यास भाग पाडणारे आमचे परम मित्र श्री. अभिषेक देशपांडे, श्री. चेतन मोरे, डॉ. राहुल सारूळे, निळकंठ सोमवंशी (STI), सचिन मोठे, रजनी चामले, स्नेहा चिखलीकर, रोहिणी दिवेगावकर, श्री. शशिकिरण सुर्यवंशी, श्री. आनंद सुर्यवंशी, श्री. संगमेश्वर चौधरी, श्री. दिनेश लोखंडे, श्री. सचिन पोतले, श्री. रामेश्वर गवरे, अतुल ताडमाडगे यांनी या पुस्तकामध्ये जे जे सहकार्य केले यांचेही मनस्वी आभार !!

आगामी सर्व परीक्षांसाठी सर्वांना खुप खुप शुभेच्छा !!

आपला

मनोज मधुकरराव गवरे (रेही).

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

Additional information
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.