TET Paper 1 va Paper 2 Sampurn Margdarshan Ksagar (TET पेपर १ व पेपर २ संपूर्ण मार्गदर्शक) K Sagar
के’ सागरीय
गेल्या काही वर्षापासून राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा प्राथमिक स्तर म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवी या वर्षासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी व उच्च प्राथमिक स्तर माणजे इयत्ता सहावी ते आठवीसाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकां-साठी अशा एकूण बोन स्तरांवर घेतली जाणार आहे.
प्राथमिक स्तरासाठी- (१) बालमानस-शास्त्र व अध्यापनशास्त्र (२) भाषा पहिली (३) भाषा दुसरी (४) गणित आणि (५) परिसर अभ्यास अशा पाच घटकांतर्गत तर-
उच्च प्राथमिक स्तरासाठी (१) बाल-मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (२) भाषा पहिली (३) भाषा दुसरी (४) गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे या चार घटकांतर्गत विहित करण्यात आलेला पाठ्यक्रम अतिशय व्यापक व विस्तृत कक्षा असणारा आहे.
या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रमाचा एकत्रित, साकल्याने व आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करून प्रस्तुतच्या संदर्भाची रचना साकारली आहे. या दोन्ही परीक्षांचा व्यापक अभ्यासक्रम लक्षात घेऊन एकात्मिक व सर्व समावेशक दृष्टिकोनातून पुस्तकाची रचना एकूण आठ विभागांत उपविषयनिहाय करण्यात आली आहे. प्रत्येक उपविषयास आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व व त्या त्या उपविषयाची व्याप्ती लक्षात घेऊन प्रत्येक विभागात संबंधित उपविषयांतर्गत आवश्यक तितकी प्रकरणे दिली आहेत. संपूर्ण पुस्तक वस्तुनिष्ठ चार पर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात असल्याने ते निश्चितच अधिक परीक्षाभिमुख बनले आहे.
आपल्या अभ्यासक्रमात बालमानसशास्त्र व अध्यापन पद्धती यांना विलेले महत्व लक्षात घेऊन या उपविषयावरही विशेषत्वाने भरपूर व सर्वसमावेशक प्रश्न विले आहेत. साधी सोपी के’सागरीय भाषाशैली याही संदर्भात अगत्याने जपली आहे.
हा संदर्भ साकारताना पूर्वप्रकाशित अशा डी. एड. अभ्यासक्रम (प्रा. महाळक), संपूर्ण शिक्षणशास्त्र (के’सागर) व इतर के सागरीय ग्रंथांचा संदर्भ घेतला असल्याने या संदर्भाचा निर्देश येथे करणे मी अगत्याचे मानतो.
विद्यार्थी मित्रांच्या विश्वासास पात्र ठरलेला आणि आपली उपयुक्तता व विद्यार्थिप्रियता सिद्ध करणाऱ्या के’ सागरीय लेखणीतून उत्तरलेला हा आगळावेगळा संदर्भही विद्यार्थिमित्रांना यशो-मंदिराकडे घेऊन जाणाऱ्या वाटा उजळील, यात शंकाच नाही.
आपला,
की. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
Available at Ksagar Book Centre
www. ksagaronline.com or call on 9545567862 /20224453065
Reviews
There are no reviews yet.