TET Cracket Shikshak Patrata Pariksha Magil Varshanchya Prashnapatrika Paper-1 Va 2-3000 Plus-Mali Sir
मनोगत
नमस्कार शिक्षक बंधू-भगिनींनो,
सर्वप्रथम, आपण हे पुस्तक हाती घेतल्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. हे पुस्तक लिहिण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे, शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (TET) उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी का आहे, यावर विचार करणे माझ्या मागील काही वर्षाच्या अनुभवातून असे लक्षात आले आहे की, ‘अभ्यास कसा करावा’ आणि ‘परीक्षा उत्तीर्ण कशी व्हावी’ याबद्दल योग्य मार्गदर्शनाचा अभाव हे यामागील प्रमुख कारण आहे.
या परीक्षेचा अभ्यासक्रम मर्यादित असून, मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता प्रश्नांची मोठ्या प्रमाणात पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून येते. हीच बाब लक्षात घेऊन, सर्व महत्त्वाच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यांचे संकलन या पुस्तकात केले आहे. संपूर्ण अभ्यासक्रम एका पुस्तकात समाविष्ट करणे शक्य नसले तरी, या पुस्तकाच्या अभ्यासातून प्रत्येक विद्याथ्र्याला परीक्षेत यश मिळावे, हाच माझा प्रामाणिक उद्देश आहे.
हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे मार्गदर्शक ठरेल. यातील सरावातून मिळणारा अनुभव, वाढणारा आत्मविश्वास आणि अभ्यासाकडे पाहण्याची नवी दृष्टी यातून विद्यार्थ्यांना निश्चितच यश मिळेल, अशी मला खात्री आहे. हे पुस्तक तयार करताना मला आलेले अनुभव आणि प्रश्न सोडविण्याची दृष्टी विद्यार्थ्यांनी आत्मसात करून परीक्षेमध्ये त्याचा उपयोग करावा, हा यामागील हेतू आहे. माझ्या ऑनलाइन शिक्षक भरती वर्गाच्या अध्यापनाच्या अनुभवातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. या पुस्तकात केवळ प्रश्नांची उत्तरे न देता, प्रत्येक प्रश्नाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. प्रश्न सोडवताना कोणती विचारप्रक्रिया महत्त्वाची ठरते, याचे मार्गदर्शन केले आहे. तसेच, केवळ योग्य उत्तराचेच नव्हे, तर इतर पर्यायांचेही सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा सखोल अभ्यास करावा, TET पेपर 1 आणि पेपर 2 है जरी पात्रतेसाठी असले, तरी यातील अभ्यासाचा आणि प्रश्न सोडविण्याच्या सरावाचा उपयोग पुढे ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी साठीदेखील होतो, त्यामुळे दोन्ही पेपरचा अभ्यास करणे निश्चितच फायदेशीर ठरेल.
हे पुस्तक साकारताना मला परिश्रम करण्यासाठी ऊर्जा देणारे आईवडील आणि ज्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केले असे माझे मित्र व मार्गदर्शक अमोल पाटील, धुमाळ सर, मनमोहन साबळे सर, आकाश काळे सर, प्रसाद पांडव सर, वल्लभ कवडे सर, संदेश डेंगळे सर, शिवम माळी, आर्यन माळी, अश्विनी माळी मॅडम, अनुराधा काळे मॅडम, शीतल खाडे मॅडम, प्रतीक्षा मिरगणे मॅडम, रूचा मोरे मॅडम, वैष्णवी कोकाटे, प्रतीक्षा शेरकर, काझी तमन्ना, वैष्णवी राऊत, स्वामिनी, श्रेया माळी, श्वेता माळी यांच्याशिवाय या पुस्तकाची निर्मिती होणे शक्यच नव्हते, सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. मी त्या सर्वांचा मनःपूर्वक ऋणी आहे.
या पुस्तकाच्या अभ्यासातून आपण एक आदर्श शिक्षक व्हाल, याच मनःपूर्वक शुभेच्छा ! धन्यवाद !
आपला,
शहाजी शकुंतला दिलीप माळी
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.