Tati Ughada Dnyaneshwara (ताटी उघडा ज्ञानेश्वरा)-S. K. Joshi Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

Author           :  Shyamsundar Mule  

Edition          :   1 ed 

Language    ‏  :   Marathi

ISBN               :   2362

Publisher      :   Continental Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Tati Ughada Dnyaneshwara (ताटी उघडा ज्ञानेश्वरा)-S. K. Joshi Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

प्रस्तावना

डोंबिवलीचे तरुण लेखक श्री. स. कृ. जोशी यांच्या ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या ललित लेखांच्या संग्रहाला प्रस्तावना लिहिताना मला थोडा संकोच वाटत आहे. कारण, ज्या भावनोत्कट वृत्तीने त्यांनी ज्ञानदेव, नामदेव, मोरोपंत आणि चोखामेळा यांची जीवने या लेखात चित्रित केली आहेत, ती वृत्ती माझ्या ठिकाणी नाही; व त्याबरोबरच ज्या सगुण भक्तीचा जिव्हाळा त्यांच्या या लेखातून नुसता ओसंडत आहे, तो भक्तिभावही माझ्या ठिकाणी नाही. मी मराठी संतकवींचे वाङ्मय आदराने आणि गोडीने वाचलेले असले, तरी त्या वाङ्मयाशी समरस होण्याइतके वेदांती किंवा वैराग्यशील मन माझ्यापाशी नाही. त्या दृष्टीने श्री. जोशी यांच्या या लेखसंग्रहाला प्रस्तावना लिहावयाला मी खरोखरीच अनधिकारी आहे.

तरीसुद्धा रसिकतेचा एक समान धर्म आम्हा दोघांमध्ये आहे, त्यामुळे त्यांच्या या ललितलेखांना आपण प्रस्तावना लिहिणे एका अर्थाने उचित होईल, अशा विश्वासाने मी हे चार शब्द लिहीत आहे. हे लेख वाचताना दोन गोष्टी मला विशेष जाणवल्या. पहिली गोष्ट ही की, अलीकडील तरुण ललित लेखकांत सहसा न आढळणारा भक्तीचा जिव्हाळा त्यांच्या ठिकाणी ओतप्रोत आहे व दुसरी गोष्ट ही की, संतांच्या साहित्यात त्यांच्या मनोजीवनाचे जे प्रतिबिंब पडलेले आहे, ते’ सहृदयतेने आणि कल्पकतेने आत्मसात करून त्या जीवनाचे चित्र हुबेहूब उभे करण्याची कलाही त्यांना साधलेली आहे. महाराष्ट्रातील पराक्रमी ऐतिहासिक व्यक्तींवर मराठीत विपुल कथात्मक वाङ्मय गेल्या दीडशे वर्षांत निर्माण झालेले आहे पण आमच्या संतांच्या चरित्राची रसाळ आख्याने जरी महिपतीपासून दासगणूमहाराजांपर्यंत अनेक भाविक कवींनी लिहिलेली असली तरी आधुनिक लेखकांपैकी कोणीही रसिकतेने त्यांच्या जीवनात शिरण्याचा आणि ते आत्मोपम्यबुद्धीने उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केलेला निदान माझ्या तरी पाहण्यात नाही. कै. ह. भ. प. ल. रा. पांगारकर यांनी लिहिलेली ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम आणि मोरोपंत यांची चरित्रे अतिशयच सुरस आहेत यात शंका नाही. पण त्यांनी ही चरित्रे ऐतिहासिक दृष्टीने लिहिलेली असल्यामुळे त्यात संतांच्या चरित्रांतील महत्त्वाच्या घटनांचे लालित्यपूर्ण

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.