Tathagat Buddha Ani Sant Tukaram (तथागत बुद्ध आणि संत तुकाराम)-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat
₹200.00 Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
Author : A. H. Salunkhe
Edition : 1 ed 2023
Language : Marathi
ISBN : 9789384091057
Publisher : Lokayat Prakashan लोकायत प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Tathagat Buddha Ani Sant Tukaram (तथागत बुद्ध आणि संत तुकाराम)-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat
मनोगत
तथागत बुद्ध आणि संत तुकाराम ! तुकाराम बुद्धांच्या इतके जवळ पोचले होते, की त्यांच्या असंख्य वचनांमध्ये बुद्धांचा उपदेश ध्वनित झाल्याचे आढळते. हे ध्वनित होणे कधी बुद्धांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभावाने प्रतिध्वनित होणे आहे, तर कधी तुकारामांच्या जीवनातील स्वयंभू, स्वानुभूत, स्वयंस्फूर्त सत्याचे स्वयंशैलीमध्ये स्वतंत्रपणे ध्वनित होणे आहे. दुसऱ्या बाजूला मला हे दोघेही इतके जवळचे वाटतात, की मी माझ्या हृदयाच्या एकाच स्पंदनात या दोघांचाही उपदेश एकाच वेळी, किंबहुना एकरूप होऊन ध्वनित झाल्याचा अनुभव घेत असतो. हे दोघेही प्रदीर्घ काळापासून माझ्या हृदयाचा, मस्तकाचा, एवढेच नव्हे तर अवघ्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनलेले आहेत.
अर्थात, माझ्या जीवनाच्या सांस्कृतिक रचनेमध्ये तथागत बुद्धांचे स्थान सर्वोच्च आहे. माझ्या आयुष्यात भारतीय इतिहासातील ज्या इतर व्यक्तींचे स्थान अत्युच्च स्वरूपाचे आहे, त्यांमध्ये संत तुकारामांचा मी अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख करू इच्छितो. ‘तथागत बुद्ध आणि संत तुकाराम’ या पुस्तकाच्या माध्यमातून मी या दोन महामानवांच्या विचारांचा काही वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. बहुजन समाजाने या दोन्ही महापुरुषांच्या चरित्रांचे योग्य रीतीने आकलन करावे आणि त्यांचे विचार आत्मसात करून प्रत्यक्ष आचरणात उतरावावेत, असे मला नेहमी वाटत आले आहे. तसे बघितले, तर तथागत बुद्धांचा त्यांच्या नंतरच्या समग्र भारतीय संस्कृतीवर फार मोठा प्रभाव पडला आहे. स्वाभाविकच, संत तुकारामांवरही हा प्रभाव होता, हे एक ऐतिहासिक सत्य आहे. संत तुकारामांविषयी नितान्त आदर असलेल्या लोकांनी हे सत्य जाणून घेऊन बुद्धांना स्वतःच्या संतुलित दृष्टीने समजून घ्यावे आणि आपले कल्याण साधावे, या भावनेतून मी संत तुकारामांचे बुद्धांशी असलेले नाते आधारानिशी परंतु संक्षेपाने आणि केवळ दिशादर्शक म्हणून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रस्तुत पुस्तकाचे स्वरूप काहीसे संकीर्ण आहे. या पुस्तकात जे पाच लेख समाविष्ट करण्यात आले आहेत, ते प्रथमदर्शनी तरी वेगवेगळ्या विषयांवरचे आहेत. हे एक प्रकारे वेगवेगळ्या विषयांवरच्या व्याख्यानांचे व लेखांचे संकलन आहे. असे असले, तरी या सर्व विषयांमध्ये तथागत बुद्ध आणि संत तुकाराम यांच्या विचारांचा
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.