Talathi Ankganit Aani Buddhimatta Chachani 93 Prashnasanch – TCS Pattern Nusar -Sachin Dhavale
मनोगत
सचिन राजाराम
सचिन ढवळेज् पब्लिकेशन्सच्या बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण, तसेच स्पेशल पोलीस भरती अकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांना विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दत सर्व विद्यार्थी मित्रांचे शतशः आभार।
ज्यांच्याशिवाय या पुस्तकाची कल्पनाच करणे अवघड ठरेल ते म्हणजे माझे सहलेखक श्री. कोमल दस्ने सर यांनी मला है। पुस्तक तयार करण्यास सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोलाचे सहकार्य केले आहे. त्याबद्दल मी त्यांचा खुप खुप आभारी आहे. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी माझ्या बुध्दिमत्ता चाचणी व गणित शिकवणीता उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचेच फलित जणू मी मागील 8 वर्षात 95+ बॅचेस यशस्वीरित्या पार पाडल्या. या बॅचेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी माझ्या हाताखालून पडले आहेत. पण प्रत्येकच विद्यार्थी क्लास लागू शकतो असे नाही. पण जे विद्यार्थी माझे Youtube वरीत बुध्दिमत्ता चाचणी व गणिताचे Video पाहतात पण ते पुण्यात येवू शकत नाहीत किंवा काही विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत किंवा क्लास लावलेल्या विद्यार्थ्यांनाही एखादा संदर्भग्रंय आवश्यक होता तसेच राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार पुस्तकांची मराठीत सोप्या भाषेत आवृत्ती उपलब्ध नसत्यामुळे हजारो विद्यार्थी मता मागीत 5 ते 6 वर्षापासून अशा संदर्भग्रंथाची मागणी करत होते त्यांच्या मागणीला प्रतिसाद देवून हे पुस्तक लिहायला घेतले आणि ते आज पूर्णत्वास आले.
मित्रांनो कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये संख्यात्मक अभियोग्यता (अंकगणित) हा विषय Game Changing Factor ठरला आहे. म्हणून या विषयाकडे योग्य त्या वेळी लक्ष दिल्यास हा विषय सर्वाधिक न्याय देणारा ठरू शकतो हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो.
हे पुस्तक मी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी बंधू-भगिनींना समर्पित करत आहे.
सचिन ढवळेज् पब्लिकेशन्राच्या बुद्धिमत्ता बाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण तसेच स्पेशल पोलीस रती.. अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांच्या लोकप्रियतेनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या द्यार्थ्यांच्या आग्रहास्तव संख्यात्मक अभियोग्यता (अंकगणित) हे पुस्तक प्रकाशित करत आहोत.
विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकात २०२३ मध्ये TCS द्वारे घेण्यात आलेल्या आणि २०१९ मध्ये महापरीक्षा र्टलद्वारे घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेच्या एकूण ९३ प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुद्धिमत्ता चणीचे सर्व प्रश्न सखोल स्पष्टीकरणासह दिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या अगामी तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी हे पुस्तक सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.
माझे गुरूवर्य व बंधूमित्र प्रा.श्री. सचिन उवळे सर (भाऊ) यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी जी महत्त्वपूर्ण मेका बजावली व मला हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केले व अनमोल मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सरांचा रापासून आभारी आहे. तसेच या पुस्तकाच्या संकलनात मोलाचा वाटा उचलणारे माझे सर्व मित्रवर्ग, माझी पत्नी व गंच्या आशिर्वादाशिवाय माझ्या हातून हे कार्य पडणे अशक्य होते असे माझे आई-वडील यांचाही मी नापासून आभारी आहे.
श्री. कोमल दिलीप दसरे : सहलेखक :
आगामी सर्व स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी सर्व विदयार्थी मित्रांना माझ्या खूप-खूप शुभेच्छा!
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.