

Swaramayee Dr. Prabha Atre (स्वरमयी) (Marathi) (novel)
₹499.00 Original price was: ₹499.00.₹424.00Current price is: ₹424.00.
Author : Dr. Prabha Atre
Edition : 5 ed
Language : Marathi
Publisher : BookGanga
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Swaramayee Dr. Prabha Atre (स्वरमयी) (Marathi) (novel)
रसिकांच्या आणि वाचकांच्या प्रेमामुळं ‘स्वरमयी’ची पाचवी सुधारित आवृत्ती प्रकाशित होत आहे. ‘स्वरमयी’मध्ये सुप्रसिद्ध गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी वेळोवेळी लिहिलेले संगीतविषयक लेख एकत्र केले आहेत. स्वतःच्या संगीत साधनेचे आणि गुरूंनी दिलेल्या तालमीचे तल्लीनतेने केलेले चित्रण, गुरुसमान भेटलेल्या व्यक्ती, शिक्षणात संगीताचं स्थान, एक व्यक्ती एक कलाकार म्हणून मैफिलीबाहेर अनुभवलेलं जग, अशा अनेक विषयांचं निवेदन या पुस्तकात आहे.
बी.एससी., एल.एल.बी., संगीतात डॉक्टरेट, आकाशवाणीमध्ये संगीत उपनिर्माती, मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात संगीत विभाग प्रमुख, परदेशात मैफिली, प्रात्यक्षिकासह व्याख्यानं, कार्यशाळा, विद्यापीठांतून शिकवणं अशा अनेक गोष्टींमुळे डॉ. प्रभा अत्रे यांचे सांगीतिक विचार केवळ समृद्धच झाले नाहीत तर या विचारांना वर्तमानकाळाचे संदर्भही लागलेले आहेत.
संगीत कलेतील सौंदर्याबद्दलची उपजत संवेदनक्षमता, आपले विचार सोप्या शब्दांत, रेखीवपणे अभिव्यक्त करण्याइतकी भाषेवरची पकड यांमुळे डॉ. प्रभा अत्रे यांचे लेखन प्रभावी, आकर्षक आणि नेमके झाले आहे. या क्षेत्रात मिळवलेल्या चौफेर अनुभवांमुळे आणि सूक्ष्म निरीक्षणांमुळं त्यांच्या लेखनाला खोली प्राप्त झाली आहे.
वैश्विक पातळीवर एक ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका, चिंतनकार, संशोधक, शिक्षण तज्ञ, सुधारक, वाग्गेयकार, लेखिका, कवयित्री आणि गुरू म्हणून डॉ. प्रभा अत्रे यांना संगीत जगतात वेगळं स्थान मिळालं आहे. भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘टागोर अकादमी रत्न’ अशा राष्ट्रीय तसेच वेगवेगळ्या राज्य स्तरावरच्या पुरस्कारांनी त्यांच्या संगीत विषयक कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला आहे.
मराठी वाङमयात स्वतः कलावंतानं कलेबद्दलचे विचार आणि अनुभव चित्रित केलेली पुस्तकं एकंदरीत कमीच आढळतात, त्यामुळे ‘स्वरमयी’ला एक वेगळं महत्त्व आणि स्थान प्राप्त झालं आहे. ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कारानं’ या पुस्तकाला १९८९मध्ये गौरवण्यातही आलं आहे.
—————————————————————————-
बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित आणि स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे लिखित ‘सुस्वराली’ व ‘स्वरमयी’ या पुस्तकांचे प्रकाशन दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते झाले.. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी पुढे दिलेल्या Bytes of India च्या लिंक वर क्लिक करावे –
Available at Ksagar Book Centre Granth
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.